AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेला मतदान करणारा ‘मराठी माणूस’ शिवसेनेकडे!

भांडुप पश्चिम, मागाठणे, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, शिवडी, वरळी, माहिम या आठ मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांचं प्राबल्य आहे. कोणे एके काळी मनसे उमेदवारांना मत देणाऱ्या या भागांनी यावेळी शिवसेनेचे आमदार निवडून आणले आहेत.

मनसेला मतदान करणारा 'मराठी माणूस' शिवसेनेकडे!
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 29, 2019 | 10:39 AM
Share

मुंबई : मुंबईतील मराठी मतदारांवर मनसेच्या तुलनेत शिवसेनेचा प्रभाव अधिक असल्याचं विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन स्पष्ट झालं आहे. मराठीबहुल भागातील मतदारांनीही मनसेपेक्षा शिवसेनेला पसंती दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीमध्ये (Marathi Voters choose Shivsena over MNS) पाहायला मिळत आहे.

शिवसेनेने मुंबईत विधानसभेच्या 14 जागा जिंकल्या. यापैकी भांडुप पश्चिम, मागाठणे, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, शिवडी, वरळी, माहिम या आठ मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांचं प्राबल्य आहे. हे आठही मतदारसंघ 2009 मधील विधानसभा निवडणुकीत मनसेने जिंकले होते. परंतु, यावेळी मनसेचा पर्याय असतानाही मतदारांनी शिवसेना उमेदवारांना निवडून दिलं आहे. भांडुप पश्चिममध्ये तर मुंबईतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती.

विशेष म्हणजे या मतदारसंघांत सेना उमेदवारांना 20 हजार ते 67 हजार या दरम्यान मताधिक्य मिळालं आहे. काँग्रेस-भाजपसारख्या पक्षांवरुन मराठी मतदारांचा विश्वास उडाल्यामुळे शिवसेनेला पसंती मिळत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

मतदारसंघ – शिवसेना आमदार – मताधिक्य

वरळी – आदित्य ठाकरे – 67 हजार 427 (मनसे उमेदवार नाही) जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर – 58 हजार 787 (मनसे उमेदवार नाही) मागाठणे – प्रकाश सुर्वे – 49 हजार 146 (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे नयन कदम (41 हजार 015 मतं) दिंडोशी – सुनिल प्रभू – 44 हजार 511 (तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे अरुण सुर्वे (25 हजार 834 मतं) शिवडी – अजय चौधरी – 39 हजार 330 (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे संतोष नलावडे (38 हजार 350 मतं) भांडुप पश्चिम – रमेश कोरगांवकर – 29 हजार 173 (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे संदीप जळगावकर (42 हजार 782 मतं) विक्रोळी – सुनिल राऊत – 27 हजार 841 (तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे विनोद शिंदे (16 हजार 008 मतं) माहिम – सदा सरवणकर – 18 हजार 647 (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे संदीप देशपांडे (42 हजार 690 मतं)

शिवसेनेने भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या मूळ मुद्द्यापासून काहीशी फारकत घेत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केलेला असला, तरी मराठी मतदारांनी मनसेच्या तुलनेत शिवसेनेलाच पसंती (Marathi Voters choose Shivsena over MNS) दिल्याचं दिसत आहे.

मनसेच्या एकमेव आमदाराला खुद्द राज ठाकरेंकडून खुर्चीची ऑफर

गुजराती समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार असल्यामुळे मराठी माणूस शिवसेनेला पसंती देत आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुंबईत फारशी चमक दाखवता आलेली नाही. शिवसेनेने आपल्या मूळ मुद्द्याला बगल दिल्यानंतर मनसे मराठी मतदारांना आकृष्ट करण्यात अपयशी ठरल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात.

14 पैकी ज्या उर्वरित सहा मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांचं प्रमाण कमी आहे, तिथेही शिवसेनेने चांगलं मताधिक्य घेतलं आहे. त्यामुळे कोणे एके काळी मनसेची निवड करणारे मराठी मतदार (Marathi Voters choose Shivsena over MNS) पुन्हा शिवसेनेकडे वळल्याचं चित्र आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...