AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde | एकनाथ शिंदे कोरोनामुक्त, खासदार मुलासोबत रुग्णालयातून घरी

एकनाथ शिंदे कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांनी त्यांची भेट घेतली. (Eknath Shinde cure from corona)

Eknath Shinde | एकनाथ शिंदे कोरोनामुक्त, खासदार मुलासोबत रुग्णालयातून घरी
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Oct 04, 2020 | 4:12 PM
Share

मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे कोरोनामु्क्त झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, इतर पोलीस अधिकारी, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुलासोबत घरी गेले. (Eknath Shinde cure from Corona)

एकनाथ शिंदेंनी 24 सप्टेंबरला स्वत: ट्विट करून कोरोना झाल्याची माहिती दिली होती. शिंदे यांनी पीपीई किट्स घालून सातत्याने रुग्णालयांची पाहणी केली होती, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. कोरोना संसर्ग झाल्यानंतर शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असताना कोणत्याही प्रकारची लोकोपयोगी कामे अडून राहू नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातूनच कामाला सुरुवात केलेली. एकनाथ शिंदेंना कोरोना संसर्ग झाल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी होम हवन केले होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आराम करण्याचा सल्ला दिला होता.

एकनाथ शिंदे कोरोनामुक्त झाल्यामुळे राज्यातील सर्व शिवसैनिकांना आनंद झाला असल्याची भावना शिवसेना पदाधिकारी राहुल लोंढे यांनी व्यक्त केली. राज्यात कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पीपीई किटस घालून रुग्णालयांची पाहणी करत होते, असे लोंढे यांनी सांगितले.

कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील मंत्री

कॅबिनेट मंत्री

1. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : एप्रिल 2020 – कोरोनामुक्त 2. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 25 मे 2020 – कोरोनामुक्त 3. धनंजय मुंडे – सामाजिक न्याय मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 12 जून 2020 – कोरोनामुक्त 4. अस्लम शेख – वस्त्रोद्योग मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 20 जुलै 2020 – कोरोनामुक्त 5. बाळासाहेब पाटील – सहकार मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 15 ऑगस्ट 2020 – कोरोनामुक्त 6. सुनील केदार – दुग्धविकास मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 3 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त 7. नितीन राऊत – ऊर्जा मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 18 सप्टेंबर 2020 8. हसन मुश्रीफ – ग्रामविकास मंत्री (राष्ट्रवादी) – 18 सप्टेंबर 2020 9. वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण मंत्री (काँग्रेस) – 23 सप्टेंबर 2020 10. एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री (शिवसेना) – 24 सप्टेंबर 2020

राज्यमंत्री

1. अब्दुल सत्तार – महसूल (शिवसेना) – कोरोनाची लागण : 22 जुलै 2020 – कोरोनामुक्त 2. संजय बनसोडे – पर्यावरण, रोहयो (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 2020 – कोरोनामुक्त 3. प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 7 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त 4. विश्वजीत कदम – सहकार, कृषी (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 11 सप्टेंबर 2020 5. बच्चू कडू – शालेय शिक्षण (अपक्ष) – कोरोनाची लागण : 19 सप्टेंबर 2020

संबंधित बातम्या:

Eknath Shinde Corona | एकनाथ शिंदेंना कोरोना, आदित्य ठाकरेंनी दिला ‘हा’ सल्ला

Eknath Shinde | पीपीई कि्टस घालून रुग्णालयांची पाहणी, एकनाथ शिंदेंना कोरोना

(Eknath Shinde cure from Corona)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...