AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आम्हाला शिकवू नये : अमेय खोपकर

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावर टीका (Ameya khopkar criticized on ram kadam and pravin darekar) केली आहे. 

मनसेच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आम्हाला शिकवू नये : अमेय खोपकर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Feb 05, 2020 | 12:24 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावर टीका (Ameya khopkar criticized on ram kadam and pravin darekar) केली आहे.

“पा’दरे’ पावटेंच्या इशाऱ्यांना आपण अजिबातच भीक घालत नाही आणि त्यांच्या सल्ल्याची राज ठाकरे आणि आम्हांला काडीचीही गरज नाही”, असं अमेय खोपकर यांनी ट्वीट करत प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावल निशाणा साधला.

“मनसेच्या जीवावर मोठे होऊन ज्यांनी मनसेला ‘रामराम’ ठोकला आणि बेडूकउड्या मारुन दुसऱ्या पक्षाची लाचारी सुरु केली, त्यांनी मनसेला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये”, असं ट्वीट अमेय खोपकर (Ameya khopkar criticized on ram kadam and pravin darekar)  यांनी केले.

“विचारधारा वगैरे शब्द प्रवीण दरेकरांच्या तोंडी शोभत नाहीत. सत्तेची ऊब ज्यांना सतत हवीहवीशी वाटते आणि त्यासाठी कसल्याही तडजोडी करण्याची तयारी असते त्या दरेकरांनी विचारधारेवर बोलणं हा आजचा सर्वात मोठा विनोद आहे”, अशी टीकाही खोपकर यांनी केली.

“राम कदम यांना जुने दिवस आता आठवत नसतील कदाचित, पण जेव्हा ते मनसेमध्ये होते तेव्हासुद्धा बाळासाहेबांवर आमची नितांत श्रद्धा होती आणि आजही आहे. मनसे आता शिवसेनेच्या मार्गावर आहे वगैरे बोलून आपली अक्कल पाजळू नका. कोण सत्तेच्या मागावर आहे हे आम्ही पुरेपूर ओळखून आहोत”, असं खोपकर म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि राम कदम यांनी मनसे शिवसेनेच्या वाटेवर येत असल्याचे वक्तव्य केले होते. यावरुन मनसेच्या काही नेत्यांनी दरेकर आणि कदम यांच्यावर टीका केली होती.

भाजपमध्ये येण्यापूर्वी दरेकर आणि कदम हे दोन्ही नेते मनसे पक्षाचे आमदार होते. पण कालांतराने या दोन्ही नेत्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...