AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन हवे की नको? राज्य सरकारकडून मदत मिळाली का? मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर

54 हजार 177 नागरिकांनी मनसेच्या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आपली मते नोंदवली.

लॉकडाऊन हवे की नको? राज्य सरकारकडून मदत मिळाली का? मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 25, 2020 | 11:36 AM
Share

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर सर्वेक्षण घेतले होते. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. (MNS Sandeep Deshpande released the result of online survey on Lockdown)

मनसेने समाजमाध्यमांवरुन विविध मुद्द्यांवर सात दिवसात नागरिकांचा कौल जाणून घेतला. 54 हजार 177 नागरिकांनी या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आपली मते नोंदवली. याचा कौल आज जाहीर करण्यात आला आहे.

काय आहे सर्वेक्षणाचा कौल?

1. लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का? होय – 70.3 टक्के नाही – 26 टक्के माहिती नाही – 3.7 टक्के

2. लॉकडाऊनचा तुमच्या नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे का?

होय – 89.8 टक्के नाही – 8.7 टक्के माहिती नाही – 1.5 टक्के

3. लॉकडाऊनच्या काळात आपल्या बुडालेल्या नोकरी/उद्योगधंद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली आहे का?

होय – 8.7 टक्के नाही – 84.9 टक्के माहिती नाही – 6.4 टक्के

4. राज्य सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का?

होय – 32.7 टक्के नाही – 52.4 टक्के माहिती नाही – 14.9 टक्के

5. शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत आहे का?

होय – 10.3 टक्के नाही – 74.3 टक्के माहिती नाही – 15.4 टक्के

6. लोकल रेल्वेसेवा आणि एसटी सेवा पूर्ववत सुरु झाली पाहिजे का?

होय – 76.5 टक्के नाही – 19.4 टक्के माहिती नाही – 4.1 टक्के

7. लॉकडाऊनच्या काळातील वीज देयकाबद्दल आपण समाधानी आहात का?

होय – 8.3 टक्के नाही – 90.2 टक्के माहिती नाही – 1.5 टक्के

8. लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत आणि योग्य मिळाली आहे का?

होय – 25.9 टक्के नाही – 60.7 टक्के माहिती नाही – 13.4 टक्के

9. या संपूर्ण काळात मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का?

होय – 28.4 टक्के नाही – 63.6 टक्के माहिती नाही – 8 टक्के

संबंधित बातम्या :

‘पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?’ मनसेचा मुंबईच्या महापौरांवर निशाणा

(MNS Sandeep Deshpande released the result of online survey on Lockdown)

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला