AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार रवींद्र गायकवाडांचे हजारो कार्यकर्ते ‘मातोश्री’वर येणार

उस्मानाबाद : शिवसेनेने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने समर्थकांत मोठा असंतोष पसरलाय. उमेदवारी बदलासाठी बंडखोरीचे निशाण फडकावत दबावतंत्राचा वापर करत खासदार समर्थक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. खासदार रवींद्र गायकवाड यांच्या किमान अडीच ते तीन हजार समर्थक कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. रवींद्र गायकवाड समर्थक […]

खासदार रवींद्र गायकवाडांचे हजारो कार्यकर्ते 'मातोश्री'वर येणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

उस्मानाबाद : शिवसेनेने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने समर्थकांत मोठा असंतोष पसरलाय. उमेदवारी बदलासाठी बंडखोरीचे निशाण फडकावत दबावतंत्राचा वापर करत खासदार समर्थक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. खासदार रवींद्र गायकवाड यांच्या किमान अडीच ते तीन हजार समर्थक कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

रवींद्र गायकवाड समर्थक कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेटणार असल्याचं बैठकीत ठरलं आहे. पक्षाने पुनर्विचार करुन विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी द्यावी, अन्यथा उस्मानाबादची जागा हातची जाण्याची भीती समर्थकांत व्यक्त होत आहे. या बैठकीत एका शिवसैनिकाने अंगावर रॉकेल ओतत गोंधळ घातला. गायकवाड यांना बदलून उमेदवारी न दिल्यास राजीनामासत्रसह बंडखोरीची भाषा केली जात आहे. या बैठकीला खासदार गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे आमदार गैरहजर होते.

शिवसेनेने रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट करत त्यांच्या जागी युवा सेनेचे पदाधिकारी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे रवींद्र गायकवाड चर्चेत आले होते. शिवाय रवींद्र गायकवाड यांची जिल्ह्यात नॉट रिचेबल खासदार अशी ओळख झाली आहे. याची तक्रार थेट पक्ष नेतृत्त्वापर्यंत पोहोचली होती. अखेर पक्षाने उमेदवारी बदलली आहे. पण यामुळे शिवसेनेची डोकेदुखी मात्र आता वाढली आहे.

उस्मानाबादमधून राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजित सिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. निंबाळकर कुटुंबीय आणि पाटील कुटुंबीय यांचं हाडवैर आहे. त्यामुळे उस्मानाबादची लढत प्रतिष्ठेची होणार यात शंका नाही. पण त्याअगोदर शिवसेनेला अंतर्गत वाद मिटवणं जड जाणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...