BMC Election 2022 Dindoshi Court (Ward 40) : वार्ड 40मध्ये कुणाचा नगरसेवक होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 40चं गणित?

BMC Election 2022, Ward 40 : वार्ड क्रमांक 40मध्ये पुन्हा शिवसेनेचाच नगरसेवक निडवणून येतो का, या प्रश्नाचीही सध्या चर्चा आहे.

BMC Election 2022 Dindoshi Court (Ward 40) : वार्ड 40मध्ये कुणाचा नगरसेवक होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 40चं गणित?
BMC Ward 40
Image Credit source: tv9
Shubham Kulkarni | Updated on: Jun 10, 2022 | 4:00 AM

मुंबई :  महापालिका निवडणुकीची सध्या सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू असल्याचं दितंय. मुंबई (Mumbai) महापालिकेतही राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूक होणार आहे. यामुळे सगळेकडे आता निवडणुकीचा (Election) माहोल आहे. अनेकांचे वॉर्ड आरक्षित झाले तर काहींचे वॉर्ड कायम राहिले आहेत. ज्यांचे वॉर्ड आरक्षित (ward reservation) झाले त्यांना दुसऱ्या वॉर्डाची शोधाशोध करावी लागत आहे. तर ज्यांचे वॉर्ड सुरक्षित राहिले त्यांच्यावर निवडणुकीत वॉर्ड राखण्याचं धर्मसंकट ओढवलं आहे. कारण मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याची काहीच शाश्वती नाहीये. त्यामुळे सर्वच पक्षाचे नगरसेवक कामाला लागेल आहेत. 2017 मध्ये वार्ड क्रमांक 40 मध्ये शिवसेनेचे सुहास चंद्रकांत वाडकर विजयी झाले होते. आता यंदा काय होतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. कारण, राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 40मध्ये पुन्हा शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येतो का, या प्रश्नाचीही सध्या चर्चा आहे.

मागच्या निवडणुकीत काय घडलं?

2017मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानावर नजर टाकल्यास वार्ड क्रमांक 40 मधून शिवसेनेचे सुहास चंद्रकांत वाडकर विजयी झाले होते. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रसे व राष्ट्रवादीही स्वबळावर लढले होते. या निवडणुकीत मनसेही उतरली होती. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक पाहायला मिळाली होती. मात्र, या सर्वांवर मात करत सुहास चंद्रकांत वाडकर यांनी विजय मिळवला होता.

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

2017मध्ये कुणाला किती मतं मिळाली?

  • आग्रे नंदकिशोर मारुती (बहुजन समाज पार्टी) – 260
  • आव्हाड संजय बाबुराव (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) – 2815
  • मांडवे अरुण धोंडु (भाजप) – 2268
  • कविता सालियार (राष्ट्रीय समाज पक्ष) -2674
  • सांगळे भारती प्रभाकर (मनसे) – 1201
  • उगले मारुती नबाजी (समाजवादी पार्टी) – 490
  • सुहास चंद्रकांत वाडकर (शिवसेना) – 8946
  • मधुकर अनंत वाजंत्री (अपक्ष) – 261
  • यादव दिवेश रामसनेही (अपक्ष) – 55
  • नोटा – 469
  • एकूणवै ध मते – 19439

वार्ड कुठून कुठपर्यंत

वार्ड क्रमांक 73मध्ये श्याम नगर, मजास बस डेपो, जोगेश्वरी लेणी, जनता कॉलनी, जोगेश्वरी पोलीस स्टेशन आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड सर्वांसाठी खुला आहे.

Follow Us