Sanjay Raut On Padalkar | पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा; संजय राऊतांचा भाजपवर पलटवार
“पाइपलाईन कुठून टाकायची हे पाहण्यासाठीच पंतप्रधान मोदी समुद्राखालून परत येतील का?” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, “पाइपलाईन उभारणं हा दोन दिवसांचा विषय नाही,” असं म्हणत राऊत यांनी भाजप सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी भारताच्या इंधन सुरक्षेबाबत मोठं विधान करत समुद्राखालून पाइपलाईन टाकण्याच्या शक्यतेवर विचार सुरू असल्याचा दावा केला आहे.
माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले की, “होर्मूझ सामुद्रधुनी काही काळ बंद राहिली तरी अनेक देशांचं तेल थांबलं होतं. भविष्यात भारताचा कायमचा इंधन प्रश्न सोडवण्यासाठी समुद्राखालून पाइपलाईन टाकण्याचा पर्याय विचाराधीन आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली. “पाइपलाईन कुठून टाकायची हे पाहण्यासाठीच पंतप्रधान मोदी समुद्राखालून परत येतील का?” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, “पाइपलाईन उभारणं हा दोन दिवसांचा विषय नाही,” असं म्हणत राऊत यांनी भाजप सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
या मुद्द्यावरून आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Published on: May 19, 2026 04:28 PM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता

