AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीचं भवितव्य काय? संजय यांनी स्पष्टपणे सांगितलं…

Sanjay Raut on Sharad Pawar Ajit Pawar Meeting : शरद पवार अजित पवार यांच्या भेटींच्या पार्वभूमीवर महाविकास आघाडी काय निर्णय घेणार? संजय राऊत काय म्हणाले? INDIA आघाडीबद्दल काय म्हणाले? वाचा सविस्तर...

महाविकास आघाडीचं भवितव्य काय? संजय यांनी स्पष्टपणे सांगितलं...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 16, 2023 | 11:07 AM
Share

मुंबई 16 ऑगस्ट 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जात शिंदे सराकरमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. या दोन गटांमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र या सगळ्याच्या विरूद्ध परिस्थिती पाहायला मिळती आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या वारंवार भेटी होत आहेत. वरचेवर होणाऱ्या या भेटी पाहता या दोन्ही गटांमध्ये नक्की काय सुरु आहे?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सगळ्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय.

चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनाच्या दिवशी पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी ही भेट झाली. ही कौटुंबिक आणि वैयक्तिक भेट असल्याचं अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही सांगितलं. मात्र या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्न विचारले जाऊ लागलेत. त्यावर संजय राऊतांनी भाष्य केलंय.

काही कौटुंबिक अडचणी आणि कौटुंबिक कामासाठी अजित पवार आणि शरद पवार भेटले अशी माझी माहिती आहे. पवारांचे कुटुंब मोठं आहे .यावर मी अधिक बोलायला नको. पण याचा राजकारणावरती आम्ही कोणताही परिणाम होऊ देणार नाही. महाविकास आघाडी मजबुतीने उभी आहे .काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत आणि राहतील. महाविकास आघाडी तेही राहतील आणि इंडिया आघाडीमध्ये देखील राहतील.आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

शरद पवार हे महाविकास आघाडीचेचे महत्वाचे नेते आहेत. आमचे मार्गदर्शक आहेत. आमचे नेते आहेत. काल रात्री त्यांची आणि माझी फोनवरून चर्चा झाली. शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते सोलापुरात होते तिथे त्यांचे स्वागत झालं. आज ते संभाजीनगरमध्ये ते पक्ष बांधणीसाठी आहेत, असंही राऊतांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याशी आमचं काही वैयक्तिक वैर नाही. पण ते ज्या प्रकारे बिनबुडाचं, बदल्याचं राजकारण करत आहेत. त्यामुळे विरोधकांना एकत्र यावं लागलं आहे. 2024 च्या निवडणुका आम्ही जिंकू. इंडियाचं सरकार येईल. पुढचा स्वातंत्र्य दिनाचा लाल किल्ल्यावरचा सोहळा नरेंद्र मोदीजी गुजरात मध्ये आपल्या घरी बसून पाहतील किंवा माजी पंतप्रधान म्हणून समोर बसून पाहतील. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.

Follow Us
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी, म्हणाल्या...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दरोडा...
रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?; दोन दिवस रुग्णालयात...
Ramesh Mhatre Case | दोन दिवस रुग्णालयात उपचार...आता थेट कोर्टात!; रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?
ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?; ऑपरेशन टायगर पुन्हा...
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ