AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात कोंबिंग ऑपरेशन, 20 तलवारींचा साठा जप्त

नागपूर : नागपूरमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजे उद्या (11 एप्रिल) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नागपूरातील बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत पोलिसांनी तलवारीचा साठा जप्त केला. यावेळी पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 20 तलवारी जप्त केल्या. नागपुरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी उरला आहे. असं असताना सापडलेल्या […]

नागपुरात कोंबिंग ऑपरेशन, 20 तलवारींचा साठा जप्त
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

नागपूर : नागपूरमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजे उद्या (11 एप्रिल) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नागपूरातील बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत पोलिसांनी तलवारीचा साठा जप्त केला. यावेळी पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 20 तलवारी जप्त केल्या.

नागपुरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी उरला आहे. असं असताना सापडलेल्या या शस्त्रसाठ्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. समाजकंटकांकडून मतदान प्रक्रियेत खोडा घातला जाऊ शकतो, हे लक्षात घेऊन पाचपावली पोलिसांनी ही कारवाई केली.

निवडणुकीच्या काळात झोपडपट्ट्यांमधील अवैध धंदे करणारे, दारु विक्री करणारे आणि गुंडांच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. रात्रीच्या वेळी झोपडपट्ट्यांमध्ये पोलीस कसून तपासणी करीत आहेत. पाचपावलीचे पोलीस अशाच प्रकारे मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत कोंबिंग ऑपरेशन केलं. कुख्यात गुन्हेगार प्रणय सुधाकर पाटील आणि संग्राम ऊर्फ राजा पाठक यांनी मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रांची जमवाजमव केल्याचं पोलिसांना कळलं. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि 20 तलवारी जप्त केल्या.

पहिल्या टप्प्यात नागपुरात मतदान

पहिल्या टप्प्यात म्हणजे उद्या (11 एप्रिल) महाराष्ट्रातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ वाशिम या 7 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लढत नागपुरात होणार असून, भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर काँग्रेसकडून नाना पटोले रिंगणात आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली