AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे वाटतांनाचे व्हिडिओ माझ्याकडे…कसब्यात भाजप काय करतंय ? नाना पटोले यांचा गंभीर आरोप…

रवींद्र धंगेकरांना मी सांगितले आंदोलन मागे घ्या लोकांमध्ये जा, यावेळी मात्र लोकांना विकत घेऊन निवडणूक जिंकू अशी भारतीय जनता पार्टी असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

पैसे वाटतांनाचे व्हिडिओ माझ्याकडे...कसब्यात भाजप काय करतंय ? नाना पटोले यांचा गंभीर आरोप...
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 25, 2023 | 4:05 PM
Share

प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, रायपुर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या ( Kasaba Election )  संदर्भात गंभीर आरोप केला आहे. यामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे सांगत कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय नाना पटोले यांनी मंत्री पोलीस संरक्षणात पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याशिवाय रवींद्र धंगेकर यांनाच मी उपोषण मागे घ्यायला लावले असल्याचे नाना पटोले यांनी म्हंटले आहे. लोकांना विकत घेऊन निवडणुका जिंकायच्या अशी भारतीय जनता पार्टी आहे असा टोलाही यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

छत्तीसगड येथील रायपुर येथे कॉंग्रेसचे महाअधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये राज्यातील बहुतांश नेते सहभागी झाले आहे. त्याच दरम्यान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना गंभीर आरोप केले आहे.

रवींद्र धंगेकरांना मी सांगितले आंदोलन मागे घ्या लोकांमध्ये जा असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा दावा केला आहे. यावेळी मात्र लोकांना विकत घेऊन निवडणूक जिंकू अशी भारतीय जनता पार्टी असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

पुण्यातील कसबा मतदार संघात भाजपचे मंत्री पोलिसांच्या संरक्षणात पैसे वाटतायेत असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी करत त्याचे व्हीडीओ आमच्याकडे आहेत असा दावाच पटोले यांनी करत खळबळ उडवून दिली आहे.

कसबा पेठेत निवडणुकीच्या दरम्यान जो प्रकार घडला आहे त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे, निवडणूक आयोगाने त्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

विधानपरिषदेच्या निवडणूकीत कोणाला फटका बसला पाहिलं आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर निशाना साधला आहे. कसबा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय निश्चित असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.

रायपुर येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी नाना पटोले हे कसबा मतदार संघात तळ ठोकून होते. कसबा पोटनिवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायची याबाबत कॉंग्रेसने सर्व ताकद लावली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण काळात कॉंग्रेसमधील बंडखोर उमेदवार सुद्धा माघार घ्यायला लावली होती.

एकूणच कॉंग्रेससह महाविकास आघाडी सरकारने कसबा आणि चिंचवडची निवडणूक जिंकून आणायची असा पणच एक प्रकारे केला आहे. त्यात भाजपवर गंभीर आरोप करत पुरावे असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!