AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत, सरनाईकांच्या घरावर ईडीच्या छापेमारीनंतर राणेंचा टोला

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाड टाकली.

प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत, सरनाईकांच्या घरावर ईडीच्या छापेमारीनंतर राणेंचा टोला
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Nov 24, 2020 | 12:53 PM
Share

सिंधुदुर्ग : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, मात्र सरनाईक काय साधू संत नाहीत, असा टोला राणेंना लगावला. (Narayan Rane reacts on ED Raids at Shivsena MLA Pratap Sarnaik)

“कायदेशीर गोष्टींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचं नसतं. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ” असं नारायण राणे म्हणाले.

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकताना ईडीने स्थानिक प्रशासनाला या कारवाईचा थोडाही सुगावा लागू दिला नाही. ही कारवाई करण्यासाठी ईडीने पोलिसांची मदत घेण्याऐवजी सीआरपीएफच्या पथकाला खास पुण्याहून बोलावून घेतलं. हे पथक आल्यानंतर ईडीने एकाच वेळी सरनाईक यांच्या दहा ठिकाणांवर धाडी मारून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. ईडीने पूर्ण तयारी करूनच ही कारवाई केल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.

कुठे कुठे कारवाई?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाड टाकली. ईडीने ठाण्यातील हिरानंदानी येथील प्रताप सरनाईक यांच्या 23व्या मजल्यावरील घरावर, वर्तकनगरमधील कार्यालयावर आणि घोडबंदर रोडवरील विहंगम हॉटेलवर आज सकाळी धाड मारली. त्याच बरोबर सरनाईक यांच्या विहंग आणि पूर्वेश या दोन्ही चिरंजीवांच्या कार्यालय आणि घरावरही धाड मारली.

घटनाक्रम काय?

सकाळी 8 वाजता विहंग सरनाईक यांच्या घरी ईडीचे पथक दाखल विहंग सरनाईक यांची चार तास चौकशी पुण्याच्या विशेष सीआरपीएफ पथकाची मदत विहंग यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात विहंग सरनाईक यांना भाऊ पूर्वेश यांच्या घरी आणलं विहंग-पूर्वेश यांची एकत्रित चौकशी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरनाईकांच्या घरी ईडीचे छापे

हेही वाचा : टॉवर, पार्क, कॉम्प्लेक्स ते संस्कृती दहीहंडी, प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपचा पसारा नेमका किती?

(Narayan Rane reacts on ED Raids at Shivsena MLA Pratap Sarnaik)

संजय राऊतांचा इशारा

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कारवाईवरून ईडी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ईडीने भाजपची शाखा असल्याप्रमाणे कारवाई करू नये. भाजपने राजकीय सुडबुद्धीतून ही कारवाई केली असून आम्ही अशा कारवायांना घाबरणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. काळ कुणासाठी थांबत नसतो. ईडीचे हे उद्योग एक दिवस तुमच्यावरही उलटतील, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला आहे.

संबंधित बातम्या :

आमदार प्रताप सरनाईकांचे सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात

मी बोललो तर मला त्रास दिला, पवारसाहेबांना नोटीस दिली, विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी संस्थांचा वापर : छगन भुजबळ

भाजपचं सरकार असलेल्या राज्यात ईडीची रेड पडल्याचे दिसले नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या, संजय राऊतांचं थेट चॅलेंज

(Narayan Rane reacts on ED Raids at Shivsena MLA Pratap Sarnaik)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...