AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवाब मलिक कुटुंबाची उस्मानाबादेत 150 एकर जमीन! भाजपचा मोठा आरोप, ईडी चौकशीची मागणी

'मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद तालुक्यातील जवळा येथे 150 एकर जमीन आहे. इतकी जमीन खरेदी करण्यासाठी मलिक कुटुंबाकडे पैसा कुठून आला? याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केलीय. ही जमीन सिलिंगची होती, मात्र ती खरेदी करताना कोणतीही परवानगी घेतली नाही. तसंच एका कुटुंबाला इतक्या मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करता येत नसताना ती नियमबाह्य रित्या खरेदी केल्याचा आरोपही काळे यांनी केला आहे.

नवाब मलिक कुटुंबाची उस्मानाबादेत 150 एकर जमीन! भाजपचा मोठा आरोप, ईडी चौकशीची मागणी
नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची दीडशे एकर जमीन उस्मानाबादेत असल्याचा भाजपचा आरोप
| Edited By: sagar joshi | Updated on: Feb 24, 2022 | 9:28 PM
Share

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे 3 मार्चपर्यंत ईडी कोठडीत असणार आहेत. दाऊदशी संबंधित जमीन खरेदीत मनी लॉन्ड्रिंगचा (Money Laundering) आरोप त्यांच्यावर आहे. अशावेळी भाजपकडून मलिकांवर अजून एक गंभीर आरोप करण्यात आलाय. ‘मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद (Osmanabad) तालुक्यातील जवळा येथे 150 एकर जमीन आहे. इतकी जमीन खरेदी करण्यासाठी मलिक कुटुंबाकडे पैसा कुठून आला? याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे (Nitin Kale) यांनी केलीय. ही जमीन सिलिंगची होती, मात्र ती खरेदी करताना कोणतीही परवानगी घेतली नाही. तसंच एका कुटुंबाला इतक्या मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करता येत नसताना ती नियमबाह्य रित्या खरेदी केल्याचा आरोपही काळे यांनी केला आहे.

उस्मामाबाद सारख्या ग्रामीण भागात तब्बल 150 एकर जमीन घेण्याचे प्रयोजन काय? यासह जमीन खरेदी करताना मूल्यांकन कमी दाखवून खरेदी खत केले आणि सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला. शेतकरी नसताना मलिक कुटुंबाने जमीन खरेदी केली, अशा अनेक बाबी संशयास्पद आहेत. ईडीने या प्रकरणाचीही चौकशी करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय. मलिक यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांच्या नावे असलेली ही जमीन 8 वर्षांपासून पडिक आहे.

बागायती जमीन जिरायती दाखवून खरेदी!

नवाब मलिक यांची पत्नी मेहजबीन नवाब मलिक, मुलगी सना नवाब मलिक, निलोफर समीर खान, अमीर नवाब मलिक, फराज नवाब मलिक आणि बुश्रा फराज या नावाने 20 डिसेंबर 2013 रोजी जमीन खरेदी करण्यात आली. ही जमीन बागायती असताना जिरायती दाखवून मूल्यांकन 1 कोटी 20 लाखाने कमी केले. त्यामुळे सरकारचा मोठा महसूल बुडाला आहे. कागदोपत्री 2 कोटी 7 लाखाला जमीन खरेदी केल्याचं नमूद करण्यात आलं. मात्र, प्रत्यक्षात जमीन खरेदी करताना जास्त रक्कम दिली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या जमिनीवर शेततळे आहे. त्यामुळे ती जमीन बागायती आहे. तसंच या जमिनीवर अलिशान बंगला असताना त्याचं मुल्यांकन खरेदी करताना दाखवण्यात आलं नाही. त्यामुळे सरकारची मोठी फसवणूक केल्याचा आरोप भाजपनं केलाय.

Nitin Kale 1

नवाब मलिक यांची उस्मानाबाद जिल्ह्यात दीडशे एकर जमीन असल्याचा भाजपचा आरोप

दीडशे एकर जमीन खरेदीसाठी पैसा कुठून आला?

दीडशे एकर जमीन खरेदी करताना मलिक कुटुंबाकडे इतका पैसा कुठून आला? असा सवाल करतानाच हा पैसा बेनामी असल्याचा आरोप भाजपने केलाय. ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांनी केली आहे. मलिक कुटुंबाच्या नावाने राज्यात अनेक ठिकाणी जमीन आहे. त्यासाठी पैसा कुठून आला याची चौकशी करण्यात यावी, असंही काळे म्हणाले. दरम्यान, मलिक कुटुंबाच्या नावावर असलेली जमीन सध्या पडिक आहे आणि या जमिनीवर सध्या लखनौ येथील वॉचमन देखरेखीचं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सुनील काकडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, राजसिंह राजे निंबाळकर, नितीन भोसले, राहुल काकडे, ओम नाईकवाडी, पांडुरंग लाटे, कुलदीप भोसले यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मलिक यांच्या जागेला भेट देत पाहणी केली.

इतर बातम्या :

Maratha Reservation : खासदार संभाजीराजे छत्रपतींचं 26 फेब्रुवारीला आमरण उपोषण, ‘वर्षा’ बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची खलबतं

नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का? भाजप प्रवक्त्यांचा खोचक सवाल

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...