AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवारांसाठी पैसे वाटप, शेकाप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ताब्यात

नवी मुंबई : प्रचारतोफा थंडावल्यानंतर आता 29 तारखेला होणाऱ्या मतदानाची प्रतीक्षा आहे. पण या दोन दिवसांच्या काळात पैसे वाटप होत असल्याचं नवी मुंबईतील कामोठ्यात समोर आलंय. मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्रति मतदार 400 रुपये या प्रमाणे पैशांची वाटप केली जात […]

पार्थ पवारांसाठी पैसे वाटप, शेकाप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ताब्यात
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM
Share

नवी मुंबई : प्रचारतोफा थंडावल्यानंतर आता 29 तारखेला होणाऱ्या मतदानाची प्रतीक्षा आहे. पण या दोन दिवसांच्या काळात पैसे वाटप होत असल्याचं नवी मुंबईतील कामोठ्यात समोर आलंय. मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्रति मतदार 400 रुपये या प्रमाणे पैशांची वाटप केली जात होती.

मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण आणि पनवेल तालुकेही येतात. पनवेलमधील कामोठ्यात शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप केलं जात होतं. प्रति मतदार 400 रुपये वाटप करताना शिवसेना कार्यकर्त्यांनी शेकाप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची मदार शेकापवर आहे. शेकाप आणि राष्ट्रवादी मिळून इथे प्रचार करत आहे.

पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पैसे वाटप करणाऱ्या दोघांवर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. भरारी पथक क्रमांक दोनमधील प्रभाग अधिकारी आणि पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे संदीप रामकृष्ण पराडकर, वैभव विठोबा पाटील अशी आहेत. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 11 हजार 900 रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह ,फोटो आणि नावे असलेली यादी सापडली.

चरणदीपसिंग, बलदेव सिंग, विकास नारायण घरात (नगरसेवक पनवेल मनपा) , महेंद्र जगन्नाथ भोपी, विजय त्रिंबक चिपळकर (नगरसेवक पनवेल मनपा) यांनी या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. कामोठे पोलिसांनी मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी भा. द.वि. कलम 171 (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पार्थ पवार विरुद्ध श्रीरंग बारणे टक्कर

मावळ मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून श्रीरंग बारणे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून पार्थ पवार हे उमेदवार आहेत. पवार कुटुंबातील व्यक्तीसाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मावळमध्ये प्रचार केला. विशेष म्हणजे पार्थ यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मावळमध्ये गेल्या काही दिवसांपासून तळ ठोकून आहेत.

महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात मावळ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होईल.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...