AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या भरसभेत राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सूनेने माईक घेतला, मुख्यमंत्री म्हणतात…

पुणे : राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे कुटुंबीयांच्या त्रासाविरोधात सूनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली. हा प्रकार पुण्यातील वडगाव शेरीला मुख्यमंत्र्यांच्या भर प्रचारसभेत घडला. यावेळी स्नेहा पठारे यांनी लाऊडस्पीकर वरुन मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच स्नेहा अचानक उभ्या राहिल्या. हातातील बॅगेतील छोटा लाऊडस्पीकर वरुन त्या बोलू लागल्या. मुख्यमंत्री साहेब मला तुमच्याशी […]

मुख्यमंत्र्यांच्या भरसभेत राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सूनेने माईक घेतला, मुख्यमंत्री म्हणतात...
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

पुणे : राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे कुटुंबीयांच्या त्रासाविरोधात सूनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली. हा प्रकार पुण्यातील वडगाव शेरीला मुख्यमंत्र्यांच्या भर प्रचारसभेत घडला. यावेळी स्नेहा पठारे यांनी लाऊडस्पीकर वरुन मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.

मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच स्नेहा अचानक उभ्या राहिल्या. हातातील बॅगेतील छोटा लाऊडस्पीकर वरुन त्या बोलू लागल्या. मुख्यमंत्री साहेब मला तुमच्याशी बोलायचंय, असं म्हणत त्या उभ्या राहिल्या तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना नंतर बोलायला वेळ देतो, असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर स्नेहा पठारे खुर्चीवर बसल्या. यावेळी संबंधित महिलेला बाहेर काढण्यासाठी पोलीस गेले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना बाजूला व्हा सांगत मी नंतर त्यांच्याशी बोलतो, असं म्हटले. त्यानंतर पोलीस बाजूला झाले.

स्नेहा पठारे यांनी पती सासू सासरे, दीर आणि आई वडिलांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत स्नेहा यांनी पतीने इच्छेविरुद्ध अनैसर्गिक संभोग आणि दिराने इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवल्याचा आरोप केला. शरीर संबंध ठेवल्याची माहिती कुणाला सांगितली तर गायब करील, अशी धमकी दीराने दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.  सासरा बापूसाहेब पठारे, सासू आणि नणंद आई-वडिलांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचाही आरोप करण्लायात आला आहे. डिसेंबर 2008 ते फेब्रुवारी 2019 या काळात हा सर्व अत्याचार सुरु असल्याचा आरोप पीडितेना केला आहे.

पाहा व्हिडीओ:

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल