रोहित पवार भेटीसाठी प्रवीण दरेकरांच्या निवासस्थानी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची भेट घेतली.

रोहित पवार भेटीसाठी प्रवीण दरेकरांच्या निवासस्थानी
रोहित पवार प्रविण दरेकर
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 11:01 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची भेट घेतली. रोहित पवार चक्क प्रवीण दरेकर यांना भेटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोन्ही नेत्यांची आज सकाळी भेट झाली. भेटीच नेमकं कारण अजून गुलदस्त्यात आहे. प्रवीण दरेकर यांचं सरकारी निवासस्थान अवंती इथे जाऊन रोहित पवार यांनी ही भेट घेतली. (NCP MLA Rohit Pawar meet BJP opposition leader Pravin Darekar today)

प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे संचालक आहेत. रोहित पवार यांचं त्यासंबंधित काही काम होतं का असा प्रश्न आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संबंध राज्याला माहिती आहेत. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

रोहित पवारांची भेट नेमकी कशासाठी?

अशा परिस्थितीत रोहित पवार यांनी थेट विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतल्याने अनेक तर्क लढविले जात आहेत. तसे पाहता रोहित पवार हे विविध पक्षातील नेत्यांना भेटत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा देशाला माहिती आहे. त्याचीही प्रचिती यानिमित्ताने आली आहे.  रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.  त्यांनी या मतदारसंघातील विकासकामांच्या निमित्ताने राजकारण्यांसोबत सेलिब्रिटींच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या.

प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल 

“सचिन वाझे यांच्या अंबानी स्फोटकप्रकरणातील सहभागामुळे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली आहे. ठाकरे सरकारने पोलिस दलात बदलांचा बाजार मांडला आहे”अशी टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

राज्यात ठाकरे सरकार आल्यानतंर कॉरंटाईन सेंटरपासून हॉस्पिटलमध्ये बलात्कार, विनयभंगाचे प्रकार घडले. महिलांवर अत्याचार राज्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. खून, दरोडे होत आहे. वाझे सारखा खाकी वर्दी माणूस अनेक प्रकरणात समावेश आहे. या सरकरमध्ये कोणतेही नियंत्रणा नसून पोलीस दलाची बदनामी झाली असून याला सर्वस्वी राज्यसरकार जबाबदार आहे असा हल्लाबोल प्रविण दरेकर यांनी केला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.