राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी, रोहित पवारांविरुद्धच दोघांचा अर्ज, पाहा संपूर्ण यादी

| Updated on: Jul 02, 2019 | 8:19 PM

सध्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. विधानसभा लढवण्यास मी इच्छुक असल्याचं रोहित पवार यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. मात्र माझा मतदारसंघ ठरला नसून वरिष्ठ ठरवतील, तिथून उभं राहणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी, रोहित पवारांविरुद्धच दोघांचा अर्ज, पाहा संपूर्ण यादी
Follow us on

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दुसरा नातू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यानंतर आता रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागण्यासाठी अर्ज केलाय. सध्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. विधानसभा लढवण्यास मी इच्छुक असल्याचं रोहित पवार यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. मात्र माझा मतदारसंघ ठरला नसून वरिष्ठ ठरवतील, तिथून उभं राहणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पण अनेक मतदारसंघांमध्ये इच्छुकांची गर्दी असल्याचं दिसतंय. रोहित पवार यांनी उमेदवारी मागितलेल्या मतदारसंघातच दोघांनी अर्ज केलाय. तर पारनेर आणि शेवगाव या मतदारसंघातही एकापेक्षा जास्त अर्ज आले आहेत. नगर जिल्ह्यात विधानसभेचे 12 मतदारसंघ आहेत. यात आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. नगर शहरासाठी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईतील कार्यालयात अर्ज भरल्याची माहिती आहे. आणखी काही नेत्यांनीही मुंबईत अर्ज भरला असण्याची शक्यता आहे.

 नगर जिल्ह्याची संपूर्ण यादी