AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jai Bhavani Jai Shivaji | व्यंकय्या नायडूंविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक, ब्राह्मण महासंघाकडून माफीची मागणी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस 'जय भवानी जय शिवाजी' असे लिहून वीस लाख पत्र पाठवणार आहे, तर ब्राह्मण महासंघाने नायडूंच्या माफीची मागणी केली आहे.

Jai Bhavani Jai Shivaji | व्यंकय्या नायडूंविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक, ब्राह्मण महासंघाकडून माफीची मागणी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jul 23, 2020 | 11:05 AM
Share

पुणे : खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने खासदार उदयनराजे यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्यामुळे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘जय भवानी जय शिवाजी’ असे लिहून वीस लाख पत्र पाठवणार आहे, तर ब्राह्मण महासंघाने नायडूंच्या माफीची मागणी केली आहे. (NCP Shivsena Protest against Venkaiah Naidu slamming Rajyasabha MP Udayanraje Bhosale for slogans after Oath)

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू माफी मागत नाहीत, तोपर्यंत खासदार उदयनराजे यांनी राज्यसभेच्या कामात भाग घेऊ नये” अशी भूमिका ब्राह्मण महासंघाच्या अनिल दवे यांनी घेतली आहे.

“नायडू आणि भाजपने आम्हा शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी” अशी मागणी अनिल दवे यांनी केली आहे.

व्यंकय्या नायडू आणि केंद्रातील भाजप सरकारचा जालन्यात निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी जय शिवाजी’ असे लिहिलेली वीस लाख पत्रे जालना जिल्ह्यातून पाठवण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ काकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोस्टकार्ड पत्र पाठवले.

“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपची असलेली खोटी भावना स्पष्ट दिसली” असे म्हणत व्यंकय्या नायडू आणि भाजपच्या वक्तव्याच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा शिवसेनेच्या वतीने निदर्शने देण्यात आली.

नेमकं काय झालं?

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात काल (22 जुलै) खासदारकीची शपथ घेतली. भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच खासदारकीची शपथ घेतली. इंग्रजीतून घेतलेल्या शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली.

“I Udayanraje Pratapsinhraje Bhosale…” अशी इंग्रजी भाषेत दमदार आवाजात शपथ घेण्यास उदयनराजेंनी सुरुवात केली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी “जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी” अशी घोषणा दिली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या” अशा शब्दात व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली. आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.

उदयनराजेंना सहा महिन्यात दुसऱ्यांदा तिकीट

उदयनराजे भोसले यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपचा झेंडा हाती धरला होता. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक लागली, परंतु पक्ष बदलणाऱ्या उदयनराजेंना मतदारांनी नाकारलं आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांना संसदेत पाठवलं. उदयनराजे भोसलेंचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपने त्यांना वरच्या सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला

संबंधित बातम्या :

इंग्रजीतून शपथ घेऊन उदयनराजे म्हणाले, जय भवानी, जय शिवाजी, सभापतींकडून समज

6 वेळा विधानसभा, 1 विधानपरिषद, 7 लोकसभा, दोनदा राज्यसभा, पवारांना सोळावी शपथ

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची मराठीतून शपथ, काँग्रेस नेता म्हणतो आता शिवसैनिक शोभता!

(NCP Shivsena Protest against Venkaiah Naidu slamming Rajyasabha MP Udayanraje Bhosale for slogans after Oath)

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!