AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Political Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचा दिवस

सुप्रीम कोर्टात आज ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या सुनावणीवेळी कोर्टाने राज्य सरकारला एम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितलं होतं.

OBC Political Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी,  राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचा दिवस
ऑर्केस्ट्रा बारमधील परफॉर्मन्ससाठीची महाराष्ट्र सरकारची 'ही' अट रद्द
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 17, 2022 | 6:55 AM
Share

मुंबई: सुप्रीम कोर्टात ओबीसी राजकीय आरक्षणावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासदंर्भात (OBC Political Reservation) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्त्वाची सुनावणी होणार असल्यानं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदत व पुनर्वसन,ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधलाय. विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रात ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय नगरपंचायतीच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं पार पडत आहेत. नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज सुप्रीम कोर्टात होणाऱ्या ओबीसी राजकीय आरक्षणाच्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र सरकार काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलं आहे. केंद्र सरकार देखील या प्रकरणी भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

सुप्रीम कोर्टात आज ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या सुनावणीवेळी कोर्टाने राज्य सरकारला एम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितलं होतं, त्याबाबतचा तपशील उद्या कोर्टात सादर केला जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टान राज्य निवडणूक आयोगाला नगरपंचायत निवडणुकीत ओबीसी राजकीय आरक्षणासाठी रिक्त ठेवलेल्या जागांवर निवडणुका घ्या पण, खुल्या प्रवर्गातून असही कोर्टान सांगितलं होतं. त्या जागांवर उद्या मतदान पार पडत आहे, त्याबाबतचा आढावा उद्या कोर्ट घेण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश आणि केंद्र सरकार देखील कोर्टात भूमिका मांडणार

मध्यप्रदेश राज्यात निवडणुका ओबीसी आरक्षणविना झालेल्या नाहीत, यासह केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा बाबत जे म्हणणं कोर्टासमोर मांडल आहे. त्याबाबतही सुप्रीम कोर्ट निर्देश देण्याची शक्यता आहे. कोरोना संकटामुळे सध्या कोर्टाचं कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्यामुळे आजची ही सुनावणी ऑनलाईनच होणार आहे. दरम्यान, राज्य सरकार इम्पेरिकल डेटा गोळा करण्याबाबत नेमकं काय म्हणणं मांडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

निकाल ओबीसीच्या बाजूनं असेल : विजय वडेट्टीवार

सुप्रीम कोर्टातून येणारा निकाल हा ओबीसी च्यां बाजूने लागणार असल्याच्या विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री तथा ओबीसी नेते विजय वड्डेट्टीवार यांनी व्यक्त केला. ते गोंदियात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारासाठी आल्यावर बोलत होते. यावेळी सरकार व आयोगात कोणतेही मतभेद नव्हते. सर्व काम सुरळीत सुरु असल्याचे त्यांनी सांगतिले. इम्पेरिकल डाटा जमा करण्यास 5 महीने लागणार असल्याबाबत बोलताना आता तर चक्क केंद्र सरकार ने सुप्रीम कोर्टात अ‌ॅफिडेविट देऊन वेळ मागितली असल्याचं त्यांनी सांगितले आहे. आपल्या पक्षाचं सरकार असलेल्या मध्यप्रदेश राज्यवर हेच संकट आलं असता केंद्र सरकारने बरोबर लाईनवर येत त्वरित अॅफिडेव्हिट देत सुप्रीम कोर्टाला वेळ मागिल्याची जबरी टीका करण्यास वड्डेट्टीवार विसरले नाहीत.

इतर बातम्या:

नागपूर – मुंबई बुलेट ट्रेनचे काम रुळावर येणार कधी; डीपीआर मार्चपर्यंत तरी होणार का?

Viral : डान्स करताना मुलासोबत घडलं असं काहीतरी, Video पाहून हसू आवरणार नाही

OBC Political Reservation live hearing in Supreme Court today important day for Maharashtra and Madhya Pradesh

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.