AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन भारतवर्ष : खासदार तडसांच्या निवडणूक आयोगासमोर उलट्या बोंबा

वर्धा : ‘टीव्ही 9’ ने ‘ऑपरेशन भारतवर्ष’ राबवत वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश केला होता. तडस यांनी या निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर करत 25 कोटी खर्च करणार असल्याची कबुली या स्टिंग ऑपरेशन दरम्यान दिली होती. निवडणूक आयोगाने या घटनेची दखल घेत तडस यांना नोटीस पाठवली होती. तडस यांनी खुलासा सादर करत ‘टीव्ही 9’वरच उलट […]

ऑपरेशन भारतवर्ष : खासदार तडसांच्या निवडणूक आयोगासमोर उलट्या बोंबा
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

वर्धा : ‘टीव्ही 9’ ने ‘ऑपरेशन भारतवर्ष’ राबवत वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश केला होता. तडस यांनी या निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर करत 25 कोटी खर्च करणार असल्याची कबुली या स्टिंग ऑपरेशन दरम्यान दिली होती. निवडणूक आयोगाने या घटनेची दखल घेत तडस यांना नोटीस पाठवली होती. तडस यांनी खुलासा सादर करत ‘टीव्ही 9’वरच उलट आरोप लावले आहेत.

निवडणूक आयोगाने तडस यांना नोटीस पाठवत या प्रकरणी उत्तर मागितलं होतं. सुरुवातीला तडस यांनी स्टिंग बघितलं नसल्याचं निवडणूक आयोगाला सांगितलं. मात्र, निवडणूक आयोगाने तडस यांना स्टिंगचे व्हिडिओ देत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. यानंतर तडस यांनी नोटीसचं उत्तर द्यावं लागलं.

“व्हिडिओची मोडतोड करुन ‘टीव्ही 9’ने तो प्रसारित केला, त्यामध्ये माझा आवाज एडिट केलेला आहे. मी जे बोललेलो नाही, ते शब्द एडिट करत मी बोलल्याचं भासवण्यात आलं आहे”, असा आरोप तसड यांनी ‘टीव्ही 9’वर केला.

तसेच तडस यांनी ‘टीव्ही 9’ विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचंही सांगितलं. विधी विभाग तडस यांच्या उत्तराची तपासणी करत आहेत. विधी विभाग आणि पोलिसांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

‘टीव्ही 9 भारतवर्ष’च्या ‘ऑपरेशन भारतवर्ष’ या स्टिंगमधून महाराष्ट्रातील वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश झाला आहे. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी 10 कोटी रुपये मी खर्च केले, यावेळी 25 कोटी रुपये खर्च करेन, असे भाजप खासदार रामदास तडस यांनी ‘ऑपरेशन भारत’अंतर्गत करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटलं. तसेच, डमी उमेदवार उभे करण्यासाठी 4-4 कोटी रुपये खर्च केल्याचंही भाजप खासदार रामदास तडस यांनी कबुल केलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने तडस यांना नोटीस बजावली होती.

काय म्हणाले भाजप खासदार रामदास तडस :

  • 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी 10 कोटी रुपये मी खर्च केले, यावेळी 25 कोटी रुपये खर्च करेन – रामदास तडस
  • डमी उमेदवार उभे करण्यासाठी 4-4 कोटी रुपये खर्च केले – रामदास तडस
  • पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मी तयार – रामदास तडस
  • निवडणुकीसाठी 5 कोटी मिळाले – रामदास तडस
  • पूर्ण निवडणूक कॅशने लढवल्या जातात – रामदास तडस
  • नोटाबंदीचा काळ्या पैशावर कसलाही फरक पडला नाही – रामदास तडस

रामदास तडस कोण आहेत?

रामदास तडस हे भाजपचे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2009 साली रामदास तडस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 साली वर्धा लोकसभा निवडणूक तडस यांनी भाजपमधून लढवली आणि विजयी झाले. वर्ध्यातील देवळी नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तीनवेळा काम पाहिले. त्यानंतर 2007 ते 2009 या काळात परिवहन महामंडळात तडस संचालक होते. 2014 साली लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर, त्यांची केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

VIDEO : खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश, पाहा स्टिंग ऑपरेशन

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली