AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उस्मानाबादेत शिवसेनेला दिलासा, खासदार गायकवाड समर्थकाचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे

उस्मानाबाद : शिवसेनेला उस्मानाबादमध्ये मोठा दिलासा मिळालाय. बंडाच्या पवित्र्यात असलेले विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे समर्थक बसवराज वरनाळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. शिवसेनेकडून उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण खासदार गायकवाड समर्थक वरनाळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा […]

उस्मानाबादेत शिवसेनेला दिलासा, खासदार गायकवाड समर्थकाचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

उस्मानाबाद : शिवसेनेला उस्मानाबादमध्ये मोठा दिलासा मिळालाय. बंडाच्या पवित्र्यात असलेले विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे समर्थक बसवराज वरनाळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. शिवसेनेकडून उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण खासदार गायकवाड समर्थक वरनाळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. शिवसेनेचे विद्यमान खासदार गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्याने खासदार गायकवाडांसह त्यांचे समर्थक नाराज होते. वरनाळे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावलं. त्यामुळे शिवसेनेत बंड होणार का याकडे लक्ष लागले होते. मात्र बंडखोरी शमली आहे.

मी शिवसैनिक असून नाराज नाही. पक्षाचा आदेश आहे त्याप्रमाणे काम करणार आहे. राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्या कामासाठी भेटलो होतो, असा खुलासा गायकवाड यांनी केला. पक्षाने दोन वेळा आमदार केलं आणि एकदा खासदार केलं, अजून पक्षाने काय द्यायचं? असा सवालही त्यांनी केला. शिवाय संतप्त शिवसैनिकही शिवसेनेचं काम करतील आणि शिवसेनेची ही जागा कायम राहिल, असं खासदार गायकवाड म्हणाले.

दुसरीकडे बसवराज वरनाळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण पक्षाच्या आदेशामुळे उमेदवारी मागे घेत असल्याचं बसवराज वरनाळे यांनी सांगत शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीकडून उस्मानाबादमध्ये निंबाळकर कुटुंबाशी हाडवैर असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेतील बंड थंड झालं असलं तरी खासदार गायकवाड समर्थक यांची शिवसेनेला किती साथ मिळते यावर शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे. ओमराजे निंबाळकर यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...