AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपत्तीसाठी नगरसेवकाची जन्मदात्या आईला मारहाण

पालघर : संपत्ती नावावर करुन घेण्यासाठी जन्मदात्या आईला नगरसेवकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. शिवसेना नगरसेवक मकरंद पाटील यांनी हा कारनामा केला. याप्रकरणी मकरंद पाटील, त्यांची पत्नी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्वेता पाटील यांच्याविरोधात मकरंद पाटील यांच्या आईने पालघर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विद्यमान नगरसेवक मकरंद पाटील यांच्या आई सुचिता पाटील या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत.  निवृत्तीनंतर […]

संपत्तीसाठी नगरसेवकाची जन्मदात्या आईला मारहाण
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM
Share

पालघर : संपत्ती नावावर करुन घेण्यासाठी जन्मदात्या आईला नगरसेवकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. शिवसेना नगरसेवक मकरंद पाटील यांनी हा कारनामा केला. याप्रकरणी मकरंद पाटील, त्यांची पत्नी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्वेता पाटील यांच्याविरोधात मकरंद पाटील यांच्या आईने पालघर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

विद्यमान नगरसेवक मकरंद पाटील यांच्या आई सुचिता पाटील या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत.  निवृत्तीनंतर त्यांनी विकासक म्हणून कार्यालय सुरु केलं. पतीच्या आणि स्वतःच्या मेहनतीने त्यांनी आपली मालकी संपत्ती जमवली. मात्र, मकरंद पाटील यांनी कटकारस्थानाने ती सर्व संपत्ती आपल्या नावे केली, अशी तक्रार सुचिता पाटील यांनी केली आहे. या तक्रारीमुळे श्वेता मकरंद पाटील आणि मकरंद पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मकरंद पाटील यांच्या आई आणि श्वेता पाटील यांच्या सासू सुचिता पाटील यांच्या पालघर शहरातील गणपती एन्क्लेव या इमारतीत दोन सदनिका आहेत. त्या सदनिका त्यांनी स्वतःच्या मेहनतीने खरेदी केल्या आहेत. मात्र, मकरंद पाटील यांनी सदनिका खासदार राजेंद्र गावित यांना विकत असल्याचा बनाव करत आपल्याच आईची दिशाभूल केली. त्यांच्याकडून विविध कागदपत्रांवर खोट्या सह्या घेतल्या. इतकंच नाही तर जिवंतपणीच आपल्या आईचं मृत्यूपत्रही मकरंद पाटील यांनी बनवून घेतल्याचा आरोप आहे.

मृत्यूपत्रात त्यांनी आईने सर्व संपत्तीचा वारस म्हणून स्वत:ला देऊ केल्याचा उल्लेख केला आहे. हे सर्व होत असताना सुचिता यांनी मकरंद यांना विरोध केला. त्यामुळे मकरंद पाटील यांनी कार्यालयात स्वतःच्या आईलाच मारहाण केल्याचा आरोप आहे. जोरजबरदस्तीने त्यांची सर्व संपत्ती आपल्या नावे करुन घेतल्याचा आरोप आईने केला आहे.

सुचिता पाटील या व्याधींनी त्रस्त असतानाही आपली सून आणि नागराध्यक्षपदाच्या उमेदवार श्वेता पाटील यांच्या प्रचारासाठी पालघरला आल्या होत्या. तिथे मकरंद यांनी घराची मूळ कागदपत्रे त्यांच्याकडे मागितली. मात्र, सुचिता यांनी कागदपत्र देण्यास मनाई केली. तेव्हा मकरंद यांनी त्यांना भीती दाखविली. याआधी आपल्याला त्यांच्याकडून झालेली मारहाण आणि त्रास लक्षात घेता सुचिता यांनी सर्व कागदपत्रे मकरंद यांना दिली. मात्र, त्यांना आपल्या संपत्तीबाबतच्या कागदपत्रांबाबत शंका आली. त्यामुळे दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाकडे त्या कागदपत्रांची मागणी केली. दस्तऐवज त्यांच्या हातात आल्यानंतर त्यांनी ते तपासले, त्यात त्यांची सर्व संपत्ती मुलगा मकरंद याने स्वत:च्या नावे केल्याचे आढळून आलं. त्यानंतर सुचिता यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच मुलगा मकरंद पाटील, त्याचे साथीदार आणि सून श्वेता पाटीलसह खोट्या सह्या घेणारे डॉ.अभय पागधरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.

“नगराध्यक्षापदाच्या दावेदार असलेल्या उमेदवाराच्या घरातच अशी परिस्थिती असेल, तर ती या जनतेला काय न्याय देऊ शकेल? त्यामुळे जनतेने याचा गांभीर्याने विचार करावा”, असे आवाहनही सुचिता पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील निष्ठावंत शिवसैनिकांच्या आक्रोशाला डावलून पाटील दाम्पत्यावर विश्वास ठेवला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत घेतलं होतं. मात्र, या प्रकरणानंतर शिंदे काय पाऊल उचलतात याकडे पालघर शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...