पहिल्यांदाच वडिलांशिवाय निवडणुकीत, पंकजा मुडे आठवणीने भावूक

बीड : 2014 मध्ये भाजपने राज्यात जो अभूतपूर्व विजय मिळवला होता, त्याचे शिल्पकार दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे होते. त्यांनी स्वतः बीडमधून मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती. पण काही दिवसातच त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांच्या जागी कन्या डॉ. प्रीतम मुंडे या राजकारणात आल्या. या निवडणुकीत बीड जिल्ह्याने प्रीतम मुंडेंना भरघोस मतदान दिलंय. या निकालाच्या वातावरणात बीडच्या […]

पहिल्यांदाच वडिलांशिवाय निवडणुकीत, पंकजा मुडे आठवणीने भावूक
Follow us
| Updated on: May 23, 2019 | 10:56 AM

बीड : 2014 मध्ये भाजपने राज्यात जो अभूतपूर्व विजय मिळवला होता, त्याचे शिल्पकार दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे होते. त्यांनी स्वतः बीडमधून मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती. पण काही दिवसातच त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांच्या जागी कन्या डॉ. प्रीतम मुंडे या राजकारणात आल्या. या निवडणुकीत बीड जिल्ह्याने प्रीतम मुंडेंना भरघोस मतदान दिलंय. या निकालाच्या वातावरणात बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे भावूक झाल्या आहेत. वडील गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढत त्यांनी हॅलो बाबा असं म्हणत बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रात ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली आणि दिल्लीहून परत येताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. बीड जिल्हा त्यांच्या स्वागतासाठी सजला होता, पण नियतीला वेगळंच मान्य होतं. त्यांच्या निधनानंतर प्रीतम मुंडे यांनी निवडणूक लढवली आणि त्या विक्रमी मतांनी निवडून आल्या. या निवडणुकीत पहिल्यांदाच मुंडे भगिणींनी वडिलांशिवाय प्रचार केला.

प्रीतम मुंडेंना आघाडी

लोकसभा निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. महाराष्ट्रातही भाजप आणि शिवसेनेचीच आघाडी आहे. दुसरीकडे बीडमध्ये भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली. पण परळी शहरातून त्यांना आघाडी मिळू शकली नाही. परळी शहरातून प्रीतम मुंडे एक हजार मतांनी पिछाडीवर होत्या. इतर तालुक्यांमध्ये प्रीतम मुंडे आघाडीवर आहेत.

परळी शहराने कायमच राष्ट्रवादीला साथ दिली आहे. या निवडणुकीतही हाच ट्रेंड दिसून येतोय. परळी नगरपरिषदेची निवडणूक असो किंवा विधानसभा आणि लोकसभा, परळी शहरात मात्र भाजपला मताधिक्य मिळत नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हाभरात मुसंडी मारलेली असताना परळी शहरातून मात्र पिछाडीवर होते. परळी ग्रामीण भागात मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे यांचंच वर्चस्व कायम दिसतंय. अजून पुढील काही फेऱ्यांमध्ये चित्र स्पष्ट होईल.

बीडमध्ये प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांची थेट लढत आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीकडे राज्याचं लक्ष आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रीतम मुंडेंनी जवळपास 30 हजार मतांची आघाडी घेतली होती. देशातील सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम प्रीतम मुंडे यांच्या नावावर आहे. पण या निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली. ही लढत किती अटीतटीची झाली हे अंतिम निकालानंतरच स्पष्ट होईल.

Non Stop LIVE Update
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.