AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा पंकजांसमोर साक्षात अजित पवार-शरद पवार अवतरतात…

पवार काका-पुतण्या, फडणवीस अशा व्यक्तिरेखा पाहून पंकजा, सुजय, रोहित पवार यांची हसून पुरेवाट झाली

जेव्हा पंकजांसमोर साक्षात अजित पवार-शरद पवार अवतरतात...
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 11, 2020 | 11:59 AM
Share

मुंबई :चला हवा येऊ द्या‘च्या (Chala Hawa Yeu Dya) सेटवर राजकीय वारे वाहताना दिसणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), राष्ट्रवादीचे युवा आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar), भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी नुकतीच थुकरटवाडीत हजेरी लावली. यावेळी तिथल्या कलाकारांनी साकारलेल्या पवार काका-पुतण्या, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यापासून डोनाल्ड ट्रम्पपर्यंत व्यक्तिरेखांना पाहून पंकजा, सुजय आणि रोहित पवार यांची हसून पुरेवाट झाली. (Pankaja Munde Rohit Pawar Sujay Vikhe in Chala Hawa Yeu Dya)

पवार काका-पुतण्या अवतरले

‘चला हवा येऊ द्या’चे सूत्रसंचालक डॉ. नीलेश साबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका साकारली, तर डॉ. दीपक देशपांडे यांनी आपल्या खास शैलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची व्यक्तिरेखा उभी केली. थुकरटवाडीच्या फार्म हाऊसचे मालक म्हणून विशेष खुर्चीत बसणारे अभिनेते स्वप्नील जोशी यांना साबळेंनी प्रवीण तरडेंची उपमा दिली. तर ‘मुंबई पुणे मुंबई’ सिनेमाच्या धर्तीवर ‘पिंपरी चिंचवड हडपसर पिंपरी चिंचवड’ असा सिनेमा काढण्याची विनंती साबळेंच्या रुपातील ‘अजित पवारां’नी केली.

भोजपुरीवरुन टोलेबाजी

थुकरटवाडीच्या मंचावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांची भूमिकाही अवतरली. अभिनेता योगेश शिरसाटने ही व्यक्तिरेखा केली, तर भाऊ कदम डोनाल्ड तात्या ट्रम्पच्या भूमिकेत भाव खाऊन गेला. यावेळी, ट्रम्प तात्यांनी भोजपुरी चित्रपटात काम करावं, त्यांचे केस आणि त्वचा यांचे रंग शोभून दिसतील, असं योगेश म्हणाला. त्यावर, दोन दिवस (बिहारला) प्रचाराला काय गेलात, भोजपुरी-भोजपुरी करायला लागलात, असा टोला अजित पवारांच्या भूमिकेतील नीलेश साबळेंनी मारला. लुगाई रंपाट सैया ट्रम्पाट, असं सिनेमाचं नाव ठेवणार का, असा तिरकस सवालही त्यांनी विचारला.

राणे-ट्रम्प यांच्या व्यक्तिरेखांची जुगलबंदी

अभिनेता कुशल बद्रिके याने भाजप खासदार नारायण राणे यांची भूमिका वठवली. ट्रम्प यांना अभिनयाची आवड आहे, त्यांनी कोकणात यावं, मी वस्त्रहरण नाटकात डोनाल्ड ट्रम्प तात्या सरपंच ही व्यक्तिरेखा देतो, ते निवडणूक न लढता सरपंच होतील, असं कुशल म्हणताच एकच हशा पिकला.

पवार-विखे एकाच मंचावर

राजकीय मैदानात मुंडे आणि पवार या दोन दिग्गज कुटुंबांचा दबदबा आहे. विखे कुटुंबाचंही अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात बडं प्रस्थ आहे. दोन वेगवेगळ्या पक्षात असलेल्या या नेत्यांमध्ये राजकीय आखाड्यात तुफान सामना रंगताना दिसतो. विखे आणि पवार कुटुंबात विस्तवही जात नसल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजेरी लावल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये अत्यंत खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पती अमित पालवे यांच्यासोबत हजेरी लावली. तर खासदार सुजय विखे पाटीलही पत्नी धनश्री विखे यांच्यासह हजर होते.

खेळामधून राजकीय निशाणा

‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर सहभागी झालेल्या जोडप्यांसोबत एक खेळ खेळण्यात आला. रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता. यामध्ये चलाखीने घड्याळाचा समावेश करण्यात आला होता. योगायोगाने भाजप नेते सुजय विखे यांची पत्नी धनश्री आणि पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांनी रिंग टाकली आणि नेमकी घड्याळावर पडली. (Pankaja Munde Rohit Pawar Sujay Vikhe in Chala Hawa Yeu Dya)

पंकजांचा रोहित पवारांना टोला

त्यानंतर तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्ती नका हो फोडू, असा टोला पंकजा मुंडे यांनी रोहित पवारांना लगावला. राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले बंधू धनंजय मुंडे यांच्यावर पंकजांचा रोख होता, हे सांगायला राजकीय विश्लेषकांची गरज नाही. “सुजयची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत” असा टोमणा पंकजांनी मारताच “घरच्यांना माहिती असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे” असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं.

संबंधित बातम्या :

रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो, थुकरटवाडीत पंकजांचा टोला

‘चला हवा येऊ द्या’मधलं ‘सुनैना बद्रिके यांचे कथक क्लासेस’ नेमकं आहे तरी काय?

(Pankaja Munde Rohit Pawar Sujay Vikhe in Chala Hawa Yeu Dya)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...