AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे आमने-सामने, हस्तांदोलन करुन सदिच्छा

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे आज पिंपरीत आमने-सामने आले. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी हस्तांदोलन करत एकमेकांना सदिच्छा दिल्या. पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्या भेटीची मावळ लोकसभा मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली. राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. कुठे प्रचाराचा धुरळा उडतोय, तर कुठे उमेदवारी […]

पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे आमने-सामने, हस्तांदोलन करुन सदिच्छा
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे आज पिंपरीत आमने-सामने आले. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी हस्तांदोलन करत एकमेकांना सदिच्छा दिल्या. पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्या भेटीची मावळ लोकसभा मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली.

राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. कुठे प्रचाराचा धुरळा उडतोय, तर कुठे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेकडोंच्या संख्येत शक्तिप्रदर्शन केले जात आहे. अशातच महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात आज काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं.

मावळचे दोन्ही उमेदवार म्हणजे पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बारणे आणि पार्थ अर्ज दाखल करण्यासाठी आले असताना, एकमेकांसोर आले. त्यावेळी त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं आणि सदिच्छाही दिल्या. यावेळी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, अमर साबळे, आमदार बाळा भेगडे इत्यादी नेते उपस्थित होते.

मावळमध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे अशी तगडी लढत होणार आहे. एरवी श्रीरंग बारणेंसाठी सहज विजयाची असणारी ही निवडणूक पार्थ पवारांच्या एन्ट्रीने आव्हानात्मक बनली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचारालाही वेगळी रंगत चढली आहे. याच दरम्यान दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांच्या समोर येऊन हस्तांदोलन करतात, हे पाहून वैचारिक परिपक्वता दिसून आली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...