लातूरच्या सभेत मोदींकडून सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

लातूर : पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनी पहिलं मत बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैनिकांना समर्पित करावं, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या नावाने मतं मागितली आहेत. एकीकडे निवडणूक आयोगन सैन्याचा फोटो किंवा त्यांच्या उल्लेख प्रचारात टाळण्याचं आवाहन करत असताना, थेट देशाच्या पंतप्रधानांनीच निवडणूक आयोगाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. लातुरातील औसा येथे शिवसेना-भाजप युतीची […]

लातूरच्या सभेत मोदींकडून सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा
Follow us on

लातूर : पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनी पहिलं मत बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैनिकांना समर्पित करावं, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या नावाने मतं मागितली आहेत. एकीकडे निवडणूक आयोगन सैन्याचा फोटो किंवा त्यांच्या उल्लेख प्रचारात टाळण्याचं आवाहन करत असताना, थेट देशाच्या पंतप्रधानांनीच निवडणूक आयोगाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. लातुरातील औसा येथे शिवसेना-भाजप युतीची प्रचारसभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तब्बल अडीच वर्षांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर एकत्र होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या सभेला उपस्थित होते.

“पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना मी आवाहन करतो की, तुम्ही तुमचं पहिलं मत बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या वीर जवानांसाठी समर्पित करु शकता ना? तुम्ही तुमचं पहिलं मतदान पुलवामात शहीद झालेल्या वीर जवानांसाठी समर्पित करु शकता ना?” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या नावे मतांचा जोगवा मागितला आहे.

तसेच, पहिलं मत देशासाठी द्या, पहिलं मत देश कणखर करण्यासाठी द्या, पहिलं मत देशात कणखर सरकार बनवण्यासाठी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

“काँग्रेस म्हणते, हिंसक क्षेत्रातून सैनिकांचे विशेष अधिकार कमी करणार, मग पाकिस्तानला सुद्धा हेच हवंय”, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “आम्ही नलक्षलवाद आणि माओवाद संपवून, आदिवासींपर्यंत विकास पोहोचवू.”

पंतप्रधान मोदींच्या लातुरातील सभेतील महत्त्वाचे मुद्दे :

– तळपत्या उन्हात तुम्ही बसला आहात, ही तपस्या वाया जाऊ देणार नाही, विकासाच्या माध्यमातून व्याजासकट परत करेन – मोदी

– लातूर आणि आजूबाजूचा परिसर संकटाशी लढून पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देतो – मोदी

– छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा आमचा प्रयत्न आहे – मोदी

– विश्वास हीच गेल्या 5 वर्षांची माझी कमाई – मोदी

सशक्त भारत बनवण्याचा संकल्प आम्ही समोर ठेवला आहे – मोदी

– कीकडे आमची नीती आणि नियत आहे, दुसरीकडे विरोधकांचा दुटप्पीपणा आहे – मोदी

– दहशतवाद्यांना घुसून मारु, हीच नव्या भारताची निती आहे – मोदी

– नक्षलवाद्यांवर प्रहार आणि आदिवासींपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आम्ही दिवस-रात्र मेहनत केली आहे – मोदी

– नक्षलवाद आणि माओवाद संपवण्याचा आमचा संकल्प आहे – मोदी

– काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टी, तेच पाकिस्तान बोलत आहे – मोदी

– काँग्रेसवाल्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा नागरिकत्व आणि मतदानाचा अधिकार हिसकावून घेतला होता – मोदी

– काँग्रेसकडून देशाला काहीच अपेक्षा नाही, मात्र शरद पवार तुम्ही पण? तुम्हाला शोभतं का? तुम्ही काँग्रेससोबत शोभत नाही- मोदी

– शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं, हेच आमचं ध्येय आहे – मोदी

– किसान क्रेडिट कार्डद्वारे विनाव्याज कर्ज मिळेल, अशी आमची जाहीरनाम्यातून घोषणा आहे – मोदी

– 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याचा आमचा संकल्प आहे – मोदी

– काँग्रेस जेव्हा कधी जाहीरनामा प्रसिद्ध करते, ते पूर्ण केले जात नाही – मोदी

– काँग्रेसचा जाहीरनामा केवळ स्वार्थासाठी, आमचा जाहीरनामा देशाच्या विकासासाठी – मोदी

– आगामी युद्ध पाण्यासाठी होतील, अशा स्थितीत भारत शांत बसेल? आम्ही जल मंत्रालयाची स्थापना करु  – मोदी

– रोजगारासाठी मेक इन इंडिया आणि मुद्रा योजनांद्वारे आम्ही काम केलं  – मोदी

– देशातील रेल्वेगाड्यांचे डब्बे लातुरात बनतील, इथे रोजगार निर्माण होईल – मोदी