AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत झालेला राडा सरवणकर पिता-पुत्राच्या अंगाशी येणार; बंदुक जप्त केल्यानंतर आता पोलिस….

प्रभादेवी राडा प्रकरणात सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त केले आहे. तसेच फायर झालेल्या गोळीची रिकामी पुंगळी देखील पोलिसांनी तपासणीसाठी पाठवली आहे.

मुंबईत झालेला राडा सरवणकर पिता-पुत्राच्या अंगाशी येणार; बंदुक जप्त केल्यानंतर आता पोलिस....
vanita kamble
vanita kamble | Updated on: Sep 13, 2022 | 6:17 PM
Share

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील प्रभादेवी परिसरात झालेला राडा सरवणकर पिता-पुत्राच्या अंगाशी येणार आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar)यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरवणकर यांचे पिस्तुल पोलिसांनी जप्त केलं आहे. या प्रकरणी सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांना पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे.

प्रभादेवी राडा प्रकरणात सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त केले आहे. तसेच फायर झालेल्या गोळीची रिकामी पुंगळी देखील पोलिसांनी तपासणीसाठी पाठवली आहे.

या प्रकरणी सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांना पोलिसांनी समन्स बजावले आहे. दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.   या दोघांचा जबाब पोलिस घेणार आहेत. नेमकं काय झालं याची चौकशी पोलिस करणार आहेत.

काय आहे नमेकं प्रकरण

अनंत चतुर्दशीच्या दिवशी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना यांच्यात तुफान राडा झाला. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केला होता. या गोळीबारातून एक पोलीस जखमी होता होता वाचला होता असा दावा देखील सुनील शिंदे यांनी केला होतं. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. अखेर सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे.

काय झालं नेमकं अनंत चतुर्थीच्या दिवशी

अनंत चतुर्थीच्या दिवशी शिंदे गट आमने सामने आले होते. स्वागत कक्षावरुन दोन्ही गटात तुफान राडा झाला. यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे.

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी