AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीमा मंडावी : भाजपचा सुपडासाफ झालेल्या भागात विजय, ‘बस्तर टायगर’ला हरवून आमदार

दंतेवाडा, छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजप आमदारासह पाच जवान शहीद झाले. छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये ही घटना घडली. भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा ज्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्यावर भूसुरुंग लावून स्फोट घडवण्यात आला, ज्यामध्ये आमदार आणि पाच जवानांचाही मृत्यू झाला. भीमा मंडावी हे छत्तीसगड विधानसभेत भाजपचे उपनेते होते. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने सपाटून मार […]

भीमा मंडावी : भाजपचा सुपडासाफ झालेल्या भागात विजय, 'बस्तर टायगर'ला हरवून आमदार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

दंतेवाडा, छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजप आमदारासह पाच जवान शहीद झाले. छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये ही घटना घडली. भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा ज्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्यावर भूसुरुंग लावून स्फोट घडवण्यात आला, ज्यामध्ये आमदार आणि पाच जवानांचाही मृत्यू झाला. भीमा मंडावी हे छत्तीसगड विधानसभेत भाजपचे उपनेते होते.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला होता. भाजपला फक्त 15 जागा जिंकता आल्या. बस्तरमध्ये जेव्हा भाजपचा सुपडासाफ झाला होता, तेव्हा भीमा मंडावी यांनी दंतेवाडा ही एकमेव जागा जिंकली होती. सर्वात अगोदर त्यांनी बस्तर टायगर अशी ओळख असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते महेंद्र कर्मा यांचा पराभव केला होता. या निकालानंतर मंडावी यांना भाजपमध्ये महत्त्व प्राप्त झालं.

राजकीय कारकीर्द

भीमा मंडावी हे अगोदर बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. या संघटनेत त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पाहिली. याच काळात 2008 मध्ये ते महेंद्र कर्मा यांना हरवून राज्याच्या पटलावर आले. झीरम घाटी नक्षलवादी हल्ल्यात महेंद्र कर्मा यांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीची लाट होती. यात महेंद्र कर्मा यांच्या पत्नी देवती कर्मा 2013 च्या निवडणुकीत जिंकून आल्या. पण 2018 च्या निवडणुकीत मंडावी यांनी देवती कर्मा यांचा पराभव केला. बस्तरमधील 12 पैकी फक्त एक जागा मंडावी यांच्या रुपाने भाजपला मिळाली होती. याचमुळे मंडावी यांची उपनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली.

आधी पत्नीचा मृत्यू, नंतर मुलीची आत्महत्या

भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख चढताच असला तरी वैयक्तिक जीवनात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. 2012 मध्ये एका अपघातात मंडावी यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2013 मध्ये मुलीनेही आत्महत्या केली. यानंतर दोन वर्षांनी मंडावी यांनी दुसरं लग्न केलं. मंडावी यांना पहिल्या पत्नीचा एक आणि दुसऱ्या पत्नीचे तीन असे एकूण चार मुलं आहेत.

संबंधित बातम्या :

नक्षलवाद्यांचा भाजपच्या ताफ्यावर हल्ला, आमदारासह पाच जवान शहीद

नक्षलवादी हल्ल्याने छत्तीसगड हादरलं, भाजप आमदारासह पाच जवानांचा मृत्यू

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली