गिरीशभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री…राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचे थेट विधान, म्हणाल्या भाऊ बोलले की…

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी मंत्री अशोक उईके तसेच इतर नेते मंडळी उपस्थित होते. प्रतिभा शिंदे यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

गिरीशभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री...राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचे थेट विधान, म्हणाल्या भाऊ बोलले की...
girish mahajan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2026 | 3:55 PM

Girish Mahajan : राज्यात मुख्यमंत्री हे सर्वात मोठं पद. राजकाणात आलेल्या प्रत्येकालाच या पदापर्यंत पोहोचायचं असतं. हे पद मिळावं यासाठी काही राजकारणी मोठे-मोठे डावपेच आखतात. राज्याच्या इतिहासात काही नेत्यांना अगदी सहज हे पद मिळालं, तर काही नेत्यांना मात्र खूपच खस्ता खाऊन मुक्यमंत्रिपदाचा मुकूट मिळाला. काही नेते तर आजही या पदाची आस लावून बसलेले आहेत. दरम्यान, सध्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आहेत. सध्यातरी ते राज्यातले सर्वशक्तीमान नेते मानले जातात. त्यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये भाजपाचेच नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. राज्यात आंदोलनं, संकटाची स्थिती किंवा सरकारला अडचणीत आणणारा कोणताही प्रसंग असो, गिरीश महाजन त्यावर तोडगा काढतातच. म्हणूनच त्यांना राजकारणातला संकटमोचक म्हटलं जातं. दरम्यान, याच गिरीश महाजनांना आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने थेट मुख्यमंत्रिपदाचा मान दिलाय. ‘गिरीशभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री’ असं प्रतिभा शिंदे भर सभेत बोलून गेल्यात.

नेमकं काय घडलं?

जळगावमध्ये आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या तथा आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रिपदाचा मान दिलाय. ‘गिरीश भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री… गिरीश भाऊ बोलले म्हणजेच मुख्यमंत्री बोलतात’ असं प्रतिभा शिंदे म्हणाल्या आहेत. जळगाव मध्ये गेल्या चार दिवसांपासून आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनकर्त्यांशी मंत्र्यांनी चर्चा केली. यावेळी सर्वच मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांन सकारात्मक आश्वासन दिले. त्याच वेळी सर्व मंत्र्यांसमोर गिरीशभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री असं विधान प्रतिभा शिंदे यांनी केलं.

Loading...

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

यावेळी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी मंत्री अशोक उईके तसेच इतर नेते मंडळी उपस्थित होते. प्रतिभा शिंदे यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us