AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवीण गायकवाड बारामतीत, ‘गोविंद बाग’मध्ये शरद पवारांची भेट

बारामती : संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी बारामतीत जाऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. प्रवीण गायकवाड यांचं नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहे. काँग्रेस प्रवीण गायकवाड यांना तिकीट देणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांनीच राहुल गांधींना प्रवीण गायकवाड यांचं नाव सुचवलं होतं. त्याला […]

प्रवीण गायकवाड बारामतीत, 'गोविंद बाग'मध्ये शरद पवारांची भेट
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

बारामती : संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी बारामतीत जाऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. प्रवीण गायकवाड यांचं नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहे. काँग्रेस प्रवीण गायकवाड यांना तिकीट देणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांनीच राहुल गांधींना प्रवीण गायकवाड यांचं नाव सुचवलं होतं. त्याला राहुल गांधी यांनी हिरवा कंदीलही दिला. मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या प्रवीण गायकवाड यांच्यासह बाहेरुन पक्षात आलेल्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रवीण गायकवाड यांनी थेट आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीतील गोविंद बाग या पवारांच्या निवासस्थानी प्रवीण गायकवाड आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली.

पुणे लोकसभा जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे प्रवीण गायकवाड यांनी तिकीट मिळवण्यासाठी तर शरद पवारांची भेट घेतली नाही ना? असा प्रश्न आहे.

आयात नेत्यांना काँग्रेसचा विरोध

पुणे लोकसभा मतदार संघात उमेदवार निवडीवरुन आजही काँग्रेसमध्ये वाद सुरु आहेत. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आयात उमेदवाराला विरोध केला आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रवीण गायकवाड यांच्या उमेदवारीबद्दल अजून स्पष्ट भूमिका घेतली नाही.

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्याबाबत काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. मात्र या चर्चेनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. आयात उमेदवार दिला जाऊ नये अशी एकमुखी मागणी, काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली. यापूर्वी बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, अनंत गाडगीळ यांनी आयात उमेदवारी देण्यावर नाराजी व्यक्त केली होती.

एकीकडे राज्यात युती, आघाडी होत असली तरी दुसरीकडे मात्र पुण्याच्या जागेचा तिढा अजून काही सुटेना. पुण्यात काँग्रेसने निष्ठवंताना बाजूला सारल्यामुळे पक्षाची मोठी डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांना बैठक घेऊन पक्षातील वाद सोडवावा लागला. आयात उमेदवार लादू नका हेच म्हणणं या बैठकीत मांडण्यात आले.

राहुल गांधींकडून प्रवीण गायकवाडांच्या नावाला हिरवा कंदील?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसने या जागेसाठी उमेदवार आयात केल्याची चर्चा आहे. संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष प्रवीण गायकवाड काँग्रेसच्या तिकिटावर पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार असतील, असं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे नाव सुचवलं होतं. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेसच्या कालच्या बैठकीत प्रवीण गायकवाडांसह अन्य नेत्यांना विरोध करण्यात आला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली