AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसी विचारांचा खराखुरा पाईक हरपला, विलासकाकांवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण भावूक

ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

काँग्रेसी विचारांचा खराखुरा पाईक हरपला, विलासकाकांवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण भावूक
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 04, 2021 | 3:26 PM
Share

कराड :  ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर (Vilas kaka Undalkar) यांच्या निधनाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (prithviraj Chavan) भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘विलासकाकांच्या निधनाने काँग्रेसी विचारांचा खराखुरा पाईक हरपला’, अशा भावना पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्या. (Prithviraj Chavan Emotional while talking about Vilas kaka Undalkar)

“विलासकाकांसारखा ताकतीचा नेता यापुढे होणे अशक्य आहे. अनेक पक्षांनी काकांना आमिषं दाखवली परंतु पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहणारा, यशवंतराव चव्हाण यांचे विचार जोपासणारा खराखुरा काँग्रेसी विचारांचा पाईक हरपला”, अशा शब्दात पृथ्वीबाबांनी विलासकाकांना श्रद्धांजली वाहिली

“विलासकाकांनी 1980 ते 2014 अशी सलग 35 वर्षे दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व विलासकाकांनी केले. सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, राज्य मंत्रिमंडळात विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील. विलासकाकांनी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेलं कार्य, डोंगरी विकास निधीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दाखवलेली दूरदृष्टी त्यांचं वेगळेपण दाखवणारी आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण vs विलासकाका उंडाळकर

काँग्रेसची विचारधारा जपणारी दोन घराणी तब्बल साठ वर्षानंतर काहीच दिवसांपूर्वी एकत्र आली होती. माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर (Vilaskaka Patil Undalkar) आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे एकमेकांचे हाडवैरी एकाच व्यासपीठावर दिसले. त्याचं निमित्त होतं, विलासकाकांचे सुपुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर ( Udaysinh Vilasrao Patil ) यांचा काँग्रेसमधील प्रवेश. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर हे एकमेकांचे किती कट्टर वैरी होते, याची झलक 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्याने पाहिली.

2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदारसंघात विलासकाका उंडाळकरांनी खिंडीत गाठलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांनी 2014 आणि 2019 मध्ये बाजी मारली असली तरी त्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना किती घाम गाळावा लागला हे महाराष्ट्राने पाहिलं.  गेल्या 6 दशकात काँग्रेसमध्येच राहून हे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिले. मात्र, दोघांनीही वेगळ्या विचारधारेशी समझोता केला नाही. दोघेही काँग्रेसमध्येच राहिले.

कराड दक्षिणला आतापर्यंत तीनच आमदार!

कराड दक्षिण मतदार संघाने आत्तापर्यंत तीनच विधासभेचे आमदार पाहिले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. पहिल्यांदा ज्येष्ठ  नेते यशवंतराव मोहिते यांनी कराड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर तब्बल सात टर्म म्हणजेच सलग 35 वर्षे माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर हे कराड दक्षिणचे आमदार राहिले. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवली. त्यामध्ये चव्हाण विजयी होऊन ते कराड दक्षिणचे आमदार झाले. अशा प्रकारे कराड दक्षिण मतदारसंघाने आत्तापर्यंत तीनच आमदार पाहिले आहेत.

(Prithviraj Chavan Emotional while talking about Vilas kaka Undalkar)

हे ही वाचा

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.