AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपप्रवेशाची ऑफर होती, पण… : पृथ्वीराज चव्हाण

या, आमच्याकडे या, तुमचा चांगला उपयोग होईल, असं गमतीने म्हणत आपल्याला भाजपप्रवेशाची ऑफर आली होती, अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिली.

भाजपप्रवेशाची ऑफर होती, पण... : पृथ्वीराज चव्हाण
Anish Bendre
Anish Bendre | Edited By: SEO Team Veegam | Updated on: Sep 17, 2019 | 6:59 PM
Share

पुणे : आपल्यालाही भाजपप्रवेशाची ऑफर होती, मात्र ती गंभीर नव्हती, तर गमतीतच होती, (Prithviraj Chavan BJP Offer) अशी कबुली माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कराड दक्षिणमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची तयारी (Prithviraj Chavan BJP Offer) करत असल्याचं स्पष्टीकरणही चव्हाणांनी दिलं.

‘भाजपप्रवेशाची सिरीअस ऑफर नव्हती. पण आपलं गमतीत… या, आमच्याकडे या, तुमचा चांगला उपयोग होईल, पण गमतीने होतं. पण आता अमित शाहांनी मला इतकं सर्टिफिकेट दिलं. (Prithviraj Chavan BJP Offer) आता कोणाच्या सर्टिफिकेटची गरज आहे’ असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

उदयनराजेंविरुद्ध आघाडीचा एक्का बाहेर, पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी?

आपण स्वतः कराड दक्षिणमधून निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं स्पष्टीकरण चव्हाणांनी दिलं. मी गेली पाच वर्ष या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे कराड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, असं चव्हाणांनी सांगितलं.

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाणांना उदयनराजेंविरोधात उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र याबाबत थेट उत्तर देण्याचं त्यांनी टाळलं. पक्ष सांगेल तो आदेश पाळण्याची तयारी पृथ्वीराज चव्हाणांनी दर्शवली. तसंच उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाचा काही परिणाम होणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने आता सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होण्याची चिन्हं आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली लोकसभेची ही जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan vs Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुढे करण्यात आलं  आहे.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला