AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Lok sabha result 2019 : पुणे लोकसभा मतदारसंघ निकाल

पुणे लोकसभा मतदारसंघ : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीकडून गिरीश बापट यांनी बाजी मारली.  पुणे लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 49.84 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 मध्ये 54.14 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 5 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं […]

Pune Lok sabha result 2019 :  पुणे लोकसभा मतदारसंघ निकाल
पुणे : गिरीश बापट
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

पुणे लोकसभा मतदारसंघ : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीकडून गिरीश बापट यांनी बाजी मारली.  पुणे लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 49.84 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 मध्ये 54.14 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 5 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात एकूण 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप महायुतीकडून गिरीश बापट, तर काँग्रेस आघाडीकडून मोहन जोशी यांच्यातच प्रमुख लढत झाली.

पक्षउमेदवारनिकाल
अपक्ष/इतरअनिल जाधव (VBA)पराभूत
भाजप/शिवसेनागिरीश बापट (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीमोहन जोशी (काँग्रेस)पराभूत

राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक

सुरुवातीला एकतर्फी वाटणारी पुण्याची लढत शेवटच्या टप्प्यात मात्र रंगतदार झाली. 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचे अनिल शिरोळे हे तीन लाख 15 हजार मतांनी विजयी झाले होते. मात्र यंदा त्यांचं तिकीट कापून भाजपने गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. भाजपने उमेदवार जाहीर करुन अनेक दिवस झाले तरी काँग्रेसचा उमेदवारच ठरत नव्हता.

उमेदवारीचा घोळ शिवाय पक्षाअंतर्गत वादामुळे काँगेसला ही निवडणूक काहीशी अवघड गेली. मात्र सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतलेल्या भाजपच्या गिरीश बापट यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली, तर 2014 च्या तुलनेत पुणे लोकसभा मतदारसंघात पाच टक्क्यांनी मतदानाची आकडेवारी घटली.

विधानसभानिहाय 2019 ची मतदानाची आकडेवारी 

पुणे लोकसभा मतदारसंघ

विधानसभा                    2019

कसबा                            55.88 %

शिवाजीनगर                   46.94 %

कोथरूड                        50.26 %

वडगावशेरी                    46.41 %

कॅन्टोन्मेंट                        48.82 %

पर्वती                               52.04 %

एकूण                              49.84%

2014च्या निवडणुकीत पालकमंत्री गिरीश बापट ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आले आहेत, त्या कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान यंदा सुद्धा झालं. 2019 मधील पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 75 हजार 39 मतदारांपैकी 10 लाख 34 हजार 130 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथं मतदानात 5 टक्यांनी घट झाली. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं.

यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्य

यावेळी पुण्यातील लढत चुरशीची होणार अशीच चर्चा होती, मात्र काँग्रेसने घातलेला उमेदवारीचा घोळ तसेच तुल्यबळ उमेदवार न देता, निष्ठावंत असणाऱ्या मोहन जोशी यांना तिकीट दिले. मात्र जोशी बापटांसमोर तसं कडवं आव्हान उभं करण्यास तितके यशस्वी झाले नाहीत.

यावेळी पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न, मेट्रोचे रखडलेलं काम, पाणी पुरवठा, यासह स्थानिक मुद्यांवर ही निवडणूक झाली.

कोणाकोणाच्या सभा

  • मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा
  • नितीन गडकरी 2 सभा
  • प्रकाश जावडेकर 2 सभा
  • विनोद तावडे – 1 सभा
  • पृथ्वीराज चव्हाण 2 सभा
  • शरद पवार 2 सभा
  • अजित पवार 4 सभा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं