AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळसूत्री बाहुली, देवेंद्र फडणवीस आणि RSS; ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्याकडून भाजपवर शाब्दिक हल्ला

Sushma Andhare on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस इज पेपेट ऑफ आरएसएस!, म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जहरी टीका केली आहे. कळसूत्री बाहुली असं म्हणतही त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

कळसूत्री बाहुली, देवेंद्र फडणवीस आणि RSS; ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्याकडून भाजपवर शाब्दिक हल्ला
| Updated on: Aug 10, 2023 | 3:49 PM
Share

पुणे | 10 ऑगस्ट 2023 : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टी का केली आहे. देवेंद्र फडणवीस इज पेपेट ऑफ आरएसएस!, असं त्या म्हणाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे आरएसएसचे कळसूत्री बाहुली आहेत. त्यांना गोळकवलकारांना महापुरुषांच्या यादीत आणून बसवायचं आहे. त्यामुळे सगळंकाही सुरु आहे, असंही अंधारे म्हणाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कलंक म्हटलं तेव्हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ, आशीष शेलार, प्रसाद लाड तुटून पडायचे. आता महापुरुषांचा अपमान होताना कुठं आहेत?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.

भाजप आणि आरएसएस हे एकत्र येऊन सगळ्या गोष्टींची आखणी करत आहेत. संभाजी भिडे यांच्याकडून हे लोक सगळं करून घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांचं कौतुक करणं म्हणजे उंदराला मांजर साक्ष आहे, असा घणाघातही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे भाजपसोबत राहु शकत नाही म्हणायचे. हेच एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावर टीका करायचे. एक एक उद्योग बाहेर गेला म्हणून बोलायचे आणि आता त्यांच्याच सोबत सत्तेत बसले आहेत, असंही टीकास्त्र अंधारे यांनी डागलं आहे.

आधी टीका करणारे एकनाथ शिंदे आता अजित पवार यांचं आता कौतुक करत आहेत. मग हे लोक आधीचे लोक खरे होते की आताचे खरे आहेत? हा प्रश्न आहे. श्रीकांत शिंदे आणि भाजपचे लोक हे आक्रस्ताळेपणा करत आहेत, असा घणाघात त्यांनी केला आहे.

श्रीकांत शिंदेंनी हनुमान चालीसा म्हणून प्रश्न सुटणार आहेत का? मलाही हनुमान चालीसा येते. पण त्याने प्रश्न सुटणार आहे का? संजय शिरसाट, संतोष बांगर, किशोर पाटील, अब्दुल सत्तार या लोकांचं एकच कॉलीफिकेशन आहे. ते म्हणजे उर्मटपणा! ते त्यांची ओरीजनल कॉलिटी दाखवतायेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

स्मृती इराणी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंगांना निर्भया प्रकरणावरून साडीचोळीचा आहेर पाठवला होता. त्याच स्मृती इराणी आता मणिपूरवरून आहेर पाठवणार का? ती धमक दाखवणार का? त्यांना प्रसिद्धी हवी असते. म्हणून सोयीस्कर बोलत असतात, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी स्मृती इराणी यांच्या राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.