AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : राहुल गांधी म्हणाले सर म्हणू नका, विद्यार्थ्यांनी राहुल म्हणून हाक मारली

चेन्नई (तामिळनाडू) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. राहुल गांधी बुधवारी चेन्नईमधील स्टेला मॅरीस कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांनी तेथील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. मात्र यावेळी एका विद्यार्थींनीने राहुल गांधी यांना प्रश्न विचारताना सर असे संबोधले. यानंतर राहुल गांधी यांनी “मला सर नका बोलू”, […]

VIDEO : राहुल गांधी म्हणाले सर म्हणू नका, विद्यार्थ्यांनी राहुल म्हणून हाक मारली
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

चेन्नई (तामिळनाडू) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. राहुल गांधी बुधवारी चेन्नईमधील स्टेला मॅरीस कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांनी तेथील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. मात्र यावेळी एका विद्यार्थींनीने राहुल गांधी यांना प्रश्न विचारताना सर असे संबोधले. यानंतर राहुल गांधी यांनी “मला सर नका बोलू”, असे सांगितल्यावर तिथे उपस्थित असलेल्या मुलींनी एकच गोंधळ केला. राहुल गांधींच्या या अनोख्या अंदाजामुळे स्टेला मॅरीस कॉलेजच्या विद्यार्थीनी गांधींच्या चाहत्या झाल्या आहेत.

एकूण 30 ते 40 सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दररोज पांढऱ्या कुरत्यामध्ये दिसणारे राहुल गांधी कॉलेज तरुणांसारखे टी-शर्ट आणि जिन्समध्ये दिसत आहे. यामुळे राहुल गांधीच्या व्यक्तिमत्वाचे अनेक विद्यार्थ्यांनींनी यावेळी कौतुकही केले. तसेच देशातील शिक्षण आणि देशातील अनेक महिलांच्या समस्यांवर गांधीनी विद्यार्थ्यांनींशी संवाद साधला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले की, माझ्या आईने मला प्रेम आणि विनम्रताबद्दल शिकवले आहे. नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये जास्त करुन महिला दिसत आहेत. जोपर्यंत भारतातील महिला सत्तेत नाही येणार तोपर्यंत लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोणात बदल नाही होणार, असं त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.