आजच्या राजकीय परिस्थितीमुळे घंटा वाजते, अशी फिरकी का घेतली राज ठाकरेंनी

राज्यातील आजची परिस्थिती पाहिली तर घंटी वाजत नाही तर घंटा वाजू लागते, अशा षटकार आजच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे यांनी मारला.

आजच्या राजकीय परिस्थितीमुळे घंटा वाजते, अशी फिरकी का घेतली राज ठाकरेंनी
Image Credit source: social media
| Updated on: Jan 08, 2023 | 12:45 PM

पुणे : राजकीय व्यंगचित्र काढताना समोर चेहरा आले की दिसावे लागते. कोणाकडे बघितले की घंटी वाजते. त्यानंतर व्यंगचित्र (caricature) काढण्याची सुरुवात होते. पण राज्यातील आजची परिस्थिती पाहिली तर घंटी वाजत नाही तर घंटा वाजू लागते, अशा षटकार आजच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे (raj thackeray) यांनी मारला. यावेळी अजित पवार यांचा उल्लेख न करता पाहाटेचा शपथविधीनंतर कोणाकडे जाऊन बसले, त्याची आठवणी करुन दिली. त्यामुळे आज राजकारण कुठे जात आहे, त्यावर राज यांनी  चिंता व्यक्त केली.

पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात व्यंग, वास्तव, राजकारण या विषयावर राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी सोडले नाही.

आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं योग्य नाही. हे पंतप्रधानांना शोभत नाही. यापुर्वी मनमोहनसिंग पंतप्रधान होते. त्यांनी काय पंजाबकडे लक्ष दिले का? पंतप्रधान हे देशाचे असतात. त्यांनी देशाकडे लक्ष दिलं पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असलं पाहिजे. मोदी यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतूक करतो. मोदी यांनी राम मंदिराचा प्रश्न सोडवलाय. त्यांनी काश्मीरचा प्रश्न सोडवला. त्यामुळे त्यांचे कौतूक केले पाहिजे. परंतु जेथे चुकत आहे, तेथे स्पष्ट विरोध केलाय. २०१९ मध्ये मी तेच केले.