…म्हणून मी मोदी-शाह यांच्या विरोधात बोलतोय : राज ठाकरे

सातारा : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार उभा केला नाही. तरीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात राज्यभर प्रचारसभा घेत रान उठवत आहेत. राज ठाकरेंचे उमेदवार उभे नसताना, ते प्रचारसभा का घेत आहेत, याचं उत्तर स्वत: राज ठाकरे यांनीच दिले आहे. राज ठाकरे यांनी आज साताऱ्यात प्रचारसभा घेतली. […]

...म्हणून मी मोदी-शाह यांच्या विरोधात बोलतोय : राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

सातारा : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार उभा केला नाही. तरीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात राज्यभर प्रचारसभा घेत रान उठवत आहेत. राज ठाकरेंचे उमेदवार उभे नसताना, ते प्रचारसभा का घेत आहेत, याचं उत्तर स्वत: राज ठाकरे यांनीच दिले आहे. राज ठाकरे यांनी आज साताऱ्यात प्रचारसभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात देशात फारसं कोणी बोलत नसताना मीच कसा काय बोलतोय? असं मला विचारलं जातं, याचं उत्तर आहे माझे प्रेरणास्थान आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज.” तसेच, “मोगलांच्या विरोधात पहिला आवाज उठवणारा महाराष्ट्र होता, ब्रिटिशांविरोधात आवाज उठवणारा पहिला आवाज महाराष्ट्र होता, मग मोदी आणि शाह ह्यांच्याविरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र का पुढे नसेल?” असेही राज ठाकरे म्हणाले.

मोदी-शाह जगणं हराम करतील : राज ठाकरे

“राजा रामदेवराय या आमच्या राजाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्र अंधारात होता. कारण महाराष्ट्र बेसावध राहिला आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय की, बेसावध राहू नका. मोदी आणि शाह तुमचं जगणं हराम करू शकतात.” असे आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलं.

नोटाबंदीने काय साधलं? : राज ठाकरे

“रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पासून ते मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मोदींनी ह्या देशावर नोटबंदी लादली. असं काय होतं की ह्या सगळ्यांना तुम्हाला विश्वासात घ्यायचं नव्हतं? बरं मोदींनी नोटबंदींनी काय साधलं? नोटबंदीने ४ ते ५ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काळा पैसा होता तसाच आहे. फक्त भाजपचं सेव्हन स्टार कार्यालय दिल्लीत उभं राहिलं आणि निवडणुका जिंकायला पैसे आले हेच साध्य झालं नोटबंदीने.” असे राज ठाकरे म्हणाले.

सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह बोलणारा परिचारक मोदींच्या व्यासपीठावर कसा? : राज ठाकरे

“भारतीय जनता पक्षाचा आमदार परिचारक हा जवानांच्या कुटुंबियांबद्दल गैरउद्गार काढतो तरी भाजप कारवाई करत नाही, तो आमदार राहतो. आणि हाच परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो. हेच मोदी म्हणाले होते की व्यापारी हा सैनिकांपेक्षा जास्त शूर असतो. ही जवानांबद्दलची आस्था.” असे म्हणत राज ठाकरेंनी प्रशांत परिचारक यांच्यावरुन मोदींवर निशाणा साधला.

बेसावध राहू नका : राज ठाकरे

माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे. हे विसरू नका हेच माझं तुम्हाला आवाहन आहे, असे शेवटी राज ठाकरे यांनी साताऱ्यात आवाहन केलं.

VIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.