AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मराठा आंदोलनातील केसेस मागे घेतल्या तसं भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसही मागे घ्या”

रामदास आठवले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...

मराठा आंदोलनातील केसेस मागे घेतल्या तसं भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसही मागे घ्या
रामदास आठवले
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 18, 2022 | 2:58 PM
Share

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसवर भाष्य केलंय. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देणार आहे. ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या आंदोलकाच्या केसेस मागे घेतल्या तसंच भीमा कोरेगाव प्रकरणातील (Bhimakoregoan) केसेस देखील मागे घ्या, अशी विनंती करणार आहे”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

“सभेला परवानगी द्या”

1 जानेवारीला भीमा कोरेगाव हा संघर्षशिल दिवस आहे. याची सुरुवात बाबासाहेबांनी केली होती. महार समाजाच्या इतिहासाची ती आठवण आहे. लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी तिथे जमतात. आधी फ्कत आमची सभा तिथं होत असतं पण आता खूप जणांची होते. पण प्रशासनाने निर्णय घेतला आहे की त्या परिसरात आता सभा घेता येणार नाही तो योग्य आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. पण बाहेर सभा घ्यायला परवानगी द्या, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही आठवले बोललेत. चंद्रकांतदादा राज्यातील सिनियर नेते आहेत. पण त्यांच्या या वक्तव्याशी कुणीही सहमत नाहीये, असं आठवले म्हणालेत.

चंद्रकांतदादांनी भीक हा शब्दप्रयोग केला. त्यामुळे लोकांना रोष आहे. मात्र त्यांनी आता माफी मागितली आहे. मी देवेंद्रजी यांच्याशी बोललो की 307 मागे घ्या. आता ते मागे घेतले आहेत. हा विषय लांबावणं योग्य नाही. सर्वांनी शांती ठेवणे आवश्यक आहे, असंही आठवले म्हणालेत.

मविआच्या महामोर्चावर आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आघाडी ही सध्या एकत्र आहेत. निवडणुकीदरम्यान एकत्र राहतील का नाही माहीत नाही. त्यांना आमदार सांभाळता आले नाहीत. म्हणून आता मोर्चे काढतात. राज्यपाल यांच्या वक्तव्यबद्दल आम्ही नाराजी व्यक्त केली आहे, असं आठवले म्हणालेत.

Follow Us
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप