शिंदे गटाची शक्ती दिसेल, पण… शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर असं का म्हणाले?

| Updated on: Oct 05, 2022 | 5:25 PM

तत्त्व काय आणि निष्ठा काय हे शिवसेनेच्या मेळाव्यातून स्पष्ट होईल. शिवसेनेच्या मेळाव्यातून विचारांच सोनं लुटले जाईल तर शिंदे गटाच्या मेळाव्यातून पैशाचं सोनं लुटलं जाईल. सत्याची जीत नक्की होईल.

शिंदे गटाची शक्ती दिसेल, पण... शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर असं का म्हणाले?
शिंदे गटाची शक्ती दिसेल, पण... शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मनोज लेले, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात (dussehra rally) त्यांची शक्ती दिसेल अशी कबुली शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर (ravindra waikar) यांनी दिली आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा पैशाच्या जोरावर होत आहे. आमच्या दसरा मेळाव्याला लोक विचारांचं सोनं लुटण्यासाठी येतात. शिंदे गटाच्या(shinde camp) मेळाव्याला पैशाचं सोनं लुटलं जाणार आहे. असा दसरा मेळावा घेणे योग्य नाही, असं सांगतानाच शिंदेंची शक्ती दिसेल. मात्र ती खोट्या पद्धतीने असेल. खऱ्याची आणि खोट्याची लढाई आज स्पष्ट होईल, असं रवींद्र वायकर यांनी सांगितलं.

दसरा मेळाव्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. त्यापूर्वीच रवींद्र वायकर यांनी मीडियाशी संवाद साधला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील दसरा मेळावाच मोठा आणि विराट होणार असल्याचा दावा केला.

सालाबाद प्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होतोय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक स्वतःहून येतोय. कोणतंही अमिष किंवा पैसे न देता हे शिवसैनिक आले आहेत. तरीही शिवाजी पार्कवर सर्वाधिक गर्दी असणार आहे. शिवतीर्थावर तुडूंब गर्दी होईल. शिवसैनिकच नाही तर विरोधकही उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी गर्दी करतील, असं रवींद्र वायकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांनी 2012 पासून शिवसेना टिकवण्याचे काम केलं आहे. 2012 पासून आजपर्यंत हेच लोक उद्धव ठाकरे यांच्या पाया पडत होते. बीकेसीच्या व्यासपीठावर बाळासाहेबांच्या खुर्चीला स्थान देऊन जी काही नाटकं करायची आहेत ती शिंदे गटाला करू द्या. ही सर्व नाटकं आहेत. भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल, असं त्यांनी सांगितलं.

तत्त्व काय आणि निष्ठा काय हे शिवसेनेच्या मेळाव्यातून स्पष्ट होईल. शिवसेनेच्या मेळाव्यातून विचारांच सोनं लुटले जाईल तर शिंदे गटाच्या मेळाव्यातून पैशाचं सोनं लुटलं जाईल. सत्याची जीत नक्की होईल. निवडणुका कधी होतात आणि सत्ता परिवर्तन कधी करतोय असं लोकांना झालं आहे. लोक सत्ता परिवर्तनाची वाट पाहत आहेत, असं सांगतानाच शिवसेना नक्कीच उभी राहील, असंही त्यांनी सांगितलं.