Marathi News LIVE Update : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांची एकमेकांवर जोरदार टीका

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांची एकमेकांवर जोरदार टीका
uddhav thackeray
Image Credit source: twitter
अजय देशपांडे

|

Oct 06, 2022 | 7:36 AM

मुंबई :   आज दिनांक 5 ऑक्टोबर 2022  जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. आज राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. आज दसरा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. गेल्या महिन्याभरापासून दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. शेवटी तो दिवस आला आहे. बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. दुसरीकडे आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील दसरा मेळावा आहे. राज्यात सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या तीन्ही दसरा मेळाव्यांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें