AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: आता PF खात्यात वारसाचे नाव जोडणे एकदम सोपे, आधार e-Sign मुळे अवघ्या 5 मिनिटांचं काम

EPFO Aadhaar e-Sign: पीएफ खात्यात वारसाचे नाव जोडणे आता सोपे झाले आहे. आधार मदतीने e-Sign मुळे अवघ्या 5 मिनिटांत हे काम होईल. डिजिटल व्हेरिफिकेशनमुळे ही प्रक्रिया सोपी झाली आहे.

EPFO: आता PF खात्यात वारसाचे नाव जोडणे एकदम सोपे, आधार e-Sign मुळे अवघ्या 5 मिनिटांचं काम
PF खात्यात वारसाचे नाव जोडणे एकदम सोपे, आधार e-Sign मदतीला
| Updated on: Nov 12, 2026 | 7:56 AM
Share

EPFO Aadhaar e-Sign: पीएफ खात्यात आता वारसदाराचे नाव जोडणे सोपे झाले आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येईल. त्यासाठी आधार मदतीने e-Sign केल्यास हे काम अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करता येईल. डिजिटल व्हेरिफिकेशनमुळे ही प्रक्रिया सोपी झाली आहे. या प्रक्रियेसाठी तुमच्या कंपनीची, एचआरच्या परवानगीची गरज नाही. ही डिजिटल प्रक्रिया पूर्ण केल्यावर भविष्यात पीएफ आणि पेन्शनविषयीचे दावे कोणत्याही तांत्रिक अडथळ्याशिवाय कायदेशीर वारसाला पूर्ण करता येईल.

आधार बेस्ड e-Sign करण्यापूर्वी हे काम करा

आधार बेस्ड e-Sign करण्यापूर्वी ईपीएफओ सदस्यांनी हे काम करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी खातेदाराचा UAN क्रमांक सक्रिय असावा. आधार क्रमांक तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक जोडलेला असावा. EPFO च्या e-Sewa पोर्टलवरील प्रोफाईलमध्ये सदस्याचा डिजिटल फोटो आणि पत्ताही अपडेट असावा. कायदेशीर वारसदाराचा फोटो, आधार क्रमांक, जन्मतारीख, बँक खात्याचा तपशील ही माहिती असावी.

असे जोडा वारसाचे नाव

सर्वात अगोदर सदस्यांनी EPFO Unified Member Portal वर जाऊन UAN क्रमांक आणि पासवर्ड टाकून तसेच नंतर कॅप्चा कोड टाकून लॉगिन करावे. डॅशबोर्डवरील Manage टॅबमध्ये जाऊन e-Nomination हा पर्याय निवडावा.

आता प्रोफाईलवरील माहिती एकदा तपासा. त्यानंतर प्रोसीड या पर्यायावर क्लिक करा. आता येस हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. कुटुंबातील सदस्यांचा तपशील आणि फोटो अपलोड करा. युझर्स एकापेक्षा अधिक वारसाचे नाव जोडू शकतो. त्यात तो त्यांच्या वाट्याला किती रक्कम येईल याची तरतूद करू शकतो. वारसा वाट्याची टक्केवारी ठरवू शकतो. ही सर्व प्रक्रिया तो डिजिटल पद्धतीने निश्चित करू शकतो.

हा सर्व तपशील दिल्यानंतर अखेरच्या टप्प्यात e-Sign या बटणावर क्लिक करा. या ठिकाणी आता ईपीएफओ सदस्याला, कर्मचाऱ्याला त्याचा आधार क्रमांक नोंदवा लागेल. त्या आधारे त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी सबमिट केल्यावर डिजिटल प्रक्रिया पूर्ण होते. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर नॉमिनेटश हिस्ट्री एकदा तपासा. इथे ग्रीन स्टेट्‍स दिसेल म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समोर येईल.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!