AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPS Pension Hike: EPFO पेन्शनधारकांना 12 वर्षानंतर लॉटरी? 1000 रुपयांहून पेन्शन थेट 3000 रुपये होणार?

EPS Pension Hike: ईपीएफओ पेन्शनधारकांना लवकरच एक मोठा दिलासा मिळू शकतो. सेवा निवृत्ती वेतनात वाढ करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी जुनीच आहे. पेन्शन एक हजाराहून तीन हजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक होऊ घातली आहे, त्याकडे पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.

EPS Pension Hike: EPFO पेन्शनधारकांना 12 वर्षानंतर लॉटरी? 1000 रुपयांहून पेन्शन थेट 3000 रुपये होणार?
1000 रुपयांहून पेन्शन थेट 3000 रुपये होणार?
| Updated on: Nov 11, 2026 | 9:50 AM
Share

EPFO Pension Hike: ईपीएफओ पेन्शनधारकांना लवकरच आनंदवार्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक (CBT Meeting 2026) 19 नोव्हेंबर रोरीज होत आहे. नवी दिल्लीतील ईपीएफओ मुख्य कार्यालयात ही बैठक होत आहे. क्षेत्रीय पीएफ आयुक्त सुब्रत भौमिक यांनी 4 नोव्हेंबर रोजी याविषयीचे परिपत्रक जारी केले होते. या बैठकीत पेन्शन एक हजाराहून तीन हजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईपीएस 3,000 रुपये होण्याची शक्यता

सध्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएस पेन्शन सध्या एक हजार रुपये आहे. त्यात वाढ होऊन पेन्शन 3,000 रूपये होण्याची शक्यता आहे. मीडियातील काही वृत्तानुसार, श्रम मंत्रालयाने अर्थखात्यासोबत याविषयीच्या प्रस्तावावर विचार विनिमय केल्याचे समोर आले आहे. या प्रस्तावावर सहमती होण्याची अटकळ लावली जात आहे. असे झाले तर हे या वर्षीचे कर्मचाऱ्यांसाठीचे सर्वात मोठे गिफ्ट ठरणार आहे. 19 नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होण्याची आणि प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी यावर्षाच्या सुरुवातीला सुद्धा अशीच शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्यावेळी या प्रस्तावावर साधी दखलही घेण्यात आली नाही.

फेब्रुवारी 2014 पासून पेन्शनचा आकडा एकच

फेब्रुवारी 2014 पासून पेन्शनचा आकडा एकच आहे. ईपीएस पेन्शन 1,000 रुपये करण्यास मंजूरी देण्यात आली होती. त्याचवर्षी ऑगस्ट महिन्यात सरकारने अधिसूचना काढली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत सेवानिवृत्तीधारकांना गेल्या 12 वर्षांपासून किमान पेन्शन एक हजार रुपयांवरच अडकली आहे. देशभरातील विविध कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटना अनेक दिवसांपासून पेन्शन रक्कमेत वाढ करण्याची मागणी करत आहेत. महागाईच्या काळात एक हजारांची पेन्शन अत्यंत तोकडी आहे. ती वाढून पाच हजार, सात हजार करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण यावेळी पेन्शन रक्कम निदान तीन हजार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नुकतीच वाढली वेतन मर्यादा

मोदी सरकारने यंदा सप्टेंबर 2026 मध्ये ईपीएस पेन्शनच्या गणनेसाठी वेतन मर्यादा 15,000 रुपयांहून 25,000 रुपये केली. सध्या ईपीएस 2026 योजना ही संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक प्रमुख सामाजिक सुरक्षा योजना आहे. योजनेच्या नियमांनुसार, नियोक्ता, कंपनी दरमहा कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनातील 8.33 टक्के अथवा कमाल 2,083 रुपये ईपीएस फंडात जमा करते. ईपीएस अंतर्गत कमाल पेन्शनची मर्यादा नाही. कर्मचाऱ्याच्या नोकरीचा काळ आणि पेन्शन योग्य पगारावर हे अवलंबून असते.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?