यावेळी खासगी आलंय, पुढच्या वेळी सरकारी हेलिकॉप्टर… कुणाची मागणी?

पंकजा मुंडे यांचं सावरगाव येथे हेलिकॉप्टरमधून आगमन होताच हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला.

यावेळी खासगी आलंय, पुढच्या वेळी सरकारी हेलिकॉप्टर... कुणाची मागणी?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी

|

Oct 05, 2022 | 1:34 PM

बीडः भगवान भक्तीगडावरून (Bhagwan Bhakti gad) आज भाजप नेत्या पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पंकजा मुंडे यांचं काही वेळापूर्वीच भगवान भक्तीगडावर आगमन झालंय. पंकजा मुंडे (Pankaja Munde) खासगी हेलिकॉप्टरने यावेळी दसरा मेळाव्यासाठी (Dussehra Melava) आल्या. मात्र पुढील दसरा मेळाव्यासाठी त्या सरकारी हेलिकॉप्टरने आल्या पाहिजेत, अशी मागणी पंकजा मुंडेंचे राजकीय बंधू समजले जाणारे महादेव जानकर यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर आहेत. त्यांना सक्रिय होण्याची संधी वारंवार डावलण्यात येतेय.

मात्र पुढील वर्षी त्यांना खासगी हेलिकॉप्टरमधून येण्याची वेळ येऊ नये, असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं.

पंकजा मुंडे यांचं सावरगाव येथे हेलिकॉप्टरमधून आगमन होताच हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला.

त्यानंतर या कार्यकर्त्यांना प्रतिसाद देत पंकजा मुंडे यांनी व्यासपीठाकडे वाटचाल केली.

भगवान बाबांच्या प्रतिमेला अभिवान केल्यानंतर पंकजा मुंडे व्यासपीठाकडे गेल्या.

राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून तसेच इतरही राज्यांतून पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित आहेत.

पक्षांतर्गत संधी मिळत नसल्याचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी उघडपणे बोललं गेलं नसलं तरीही त्यांची नाराजी वारंवार प्रकट झालीय.

काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीही मला हारवू शकत नाहीत, असं वक्तव्य केलं. पण त्यानंतर त्यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.

पण पंकजांनी केलेलं हे वक्तव्य अनावधानाने होतं की मुद्दामहून केलं, यावरही चर्चा सुरु आहे. आज दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलतायत, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें