AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक्झिट पोल येताच संघाचे बडे पदाधिकारी सर्वात आधी ‘गडकरी’ वाड्यात!

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा रविवारी (19 मे) पार पडला आणि काही मिनिटातच देशभरातील वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलही जाहीर केले. बहुतेक सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली असताना, भाजपकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्वाच्या नेत्यांनी आज (20 मे) […]

एक्झिट पोल येताच संघाचे बडे पदाधिकारी सर्वात आधी 'गडकरी' वाड्यात!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा रविवारी (19 मे) पार पडला आणि काही मिनिटातच देशभरातील वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलही जाहीर केले. बहुतेक सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली असताना, भाजपकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्वाच्या नेत्यांनी आज (20 मे) नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.

भाजपचे पश्चिम बंगालचे प्रभारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीच कैलास विजयवर्गीय यांना नितीन गडकरींना भेटण्यास सांगितल्याची माहिती मिळते आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला बहुमत मिळणार असलं, तरी अनेक एक्झिट पोलनुसार अगदी काठावर एनडीएला मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या मोर्चेबांधणीकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे नितीन गडकरी यांचं आहे. त्यामुळे एक्झिट पोलनंतर भाजपचे ज्येष्ठ नेत्यांसह संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

दरम्यान,  TV9-CVoter च्या एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडीला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला 128 जागा आणि इतरांना 127 जागा मिळतील. यात एकट्या भाजपला 236 जागांच अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली