AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीत मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी संभाजी भिडे पहिल्या रांगेत!

सांगली : सांगलीचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. या सभेसाठी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी अगदी पहिल्या रांगेत संभाजी भिडे बसले होते. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुसऱ्यांदा सांगलीत सभा घेतली. सांगलीतील या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसह खासदार राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेवरही जोरदार […]

सांगलीत मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी संभाजी भिडे पहिल्या रांगेत!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

सांगली : सांगलीचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. या सभेसाठी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी अगदी पहिल्या रांगेत संभाजी भिडे बसले होते. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुसऱ्यांदा सांगलीत सभा घेतली.

सांगलीतील या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसह खासदार राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेवरही जोरदार टीका केली. “काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर स्वाभिमानीची आघाडी म्हणजे मेंढयांच्या रक्षणाची जबाबदारी लांडग्यावर असल्यासारखी.”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

“काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं भाषण म्हणजे काल्पनिक मुद्दे असतात. त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध नसतो. केवळ मनोरंजन असतं.” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“ज्यांना ग्रामपंचायत लढवायची सवय आहे, ते ग्रामपंचायतच लढवणार. आपण मात्र आता लोकसभा लढवत आहोत. संजयकाका संयम सोडून नका, संयम नेहमी ठेवायचा. जनता आपल्या सोबत आहे. ज्यांना हरण्याची भीती असते, तेच शिव्या शाप देत असतात. कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या. काका त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.” असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजयकाका पाटील यांना दिला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.