VIDEO | निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली

| Updated on: Oct 15, 2021 | 9:40 AM

दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे" असं संभाजी भिडे सांगलीमध्ये दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी म्हणाले.

VIDEO | निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली
Sambhaji Bhide
Follow us on

सांगली : बेधडक वक्तव्यांनी खळबळ उडवून देणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची जीभ पुन्हा घसरली. “पारतंत्र्य, गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा हा देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी सांगलीत केलं.

काय म्हणाले संभाजी भिडे?

“जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपला, देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत? लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही, चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी, मारेकरी, गनीम, शत्रू आहे, पण हिंदूना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे. तो म्हणजे निर्लज्जपणात. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं संभाजी भिडे सांगलीमध्ये दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी म्हणाले.

“या देशात देशभक्तीचा, स्वतंत्रचा, भक्तीचा आपण कोण आहोत, या जाणिवेचा प्राण नाही. कशासाठी पोटासाठी खंडाळासाठी इतकीच त्याची लायकी आहे. आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही. या देशात कसली सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनवा, यासाठी मोठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती घेतली होती. ती मोहीम पार पाडण्यासाठी आपण मोहीम करतो. मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोना वाढतो. कोरोना येतो, हा थोतांड आहे. कोरोना हा काल्पनिक आहे. कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची वस्ती असती. तर सबंध देशाचं नेतृत्व करणारे ठरले असते.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

कोरोना थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिराची कुलुपे तोडा : संभाजी भिडे

वारीवर बंदी घालून द्रौपदीच्या पदाराला हात घालण्याचं सरकारकडून पाप,संभाजी भिडे यांची टीका

कोरोना गां* लोकांना होतो, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य