सांगली : “कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे”, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले. ते सांगलीत (Sangli) बोलत होते. इतकंच नाही तर वारकरी (Pandharpur Wari) रस्त्यावर उतरले पाहिजेत, मंदिराची कुलुपे तोडायला हवीत, असंही संभाजी भिडे म्हणाले. पंढरपूरच्या वारीवर घातलेल्या बंदीला वारकर्यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं होतं, असं त्यांनी नमूद केलं.