AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारीवर बंदी घालून द्रौपदीच्या पदाराला हात घालण्याचं सरकारकडून पाप,संभाजी भिडे यांची टीका

आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी देण्याच्या मुद्यावरुन आणि बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या कारवाईचा विरोध करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून कराडच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

वारीवर बंदी घालून द्रौपदीच्या पदाराला हात घालण्याचं सरकारकडून पाप,संभाजी भिडे यांची टीका
संभाजी भिडे, (फाईल फोटो)
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 1:34 PM
Share

सातारा: आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी देण्याच्या मुद्यावरुन आणि बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या कारवाईचा विरोध करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून कराडच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचे पाप सरकारने केल्याची टीका संभाजी भिडे यांनी कराड येथे केली.

कराड तहसीलदारांना निवेदन

बंडातात्या कराडकर यांनी वारीसंदर्भात भूमिका घेतल्यानंतर स्थानबध्द कारवाईच्या निषेर्धात शिवप्रतिष्ठान संघटनेने कराड येथे निषेध मोर्चा काढून संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत कराड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. वारीचा मुक्काम जिथं जिथं होतो, त्या त्या गावात परिसरातील लोकांनी येऊन एकत्र मुक्काम करावा, असं आवाहन संभाजी भिडे यांनी केलं. पोलीस अडवतील पण विरोध मोडून काढा, असे आवाहन शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी केले.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा मोर्चा

जय जय राम कृष्ण हरीच्या गजरात बंडातात्या कराडकर यांच्या वरील कारवाईच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान संघटनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी जय जय राम कृष्ण हरीच्या गजरात धारकरी मोर्चात सहभागी झाले होते.

बंडातात्या कराडकर कोण आहेत?

हभप बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तसेच ते समाज प्रबोधनकारही आहेत. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता. यापूर्वी गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं. गो हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

व्यसनमुक्तीची चळवळ

हभप बंडातात्यांनी 1996मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली होती. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी ही संस्था काम करते. गेल्या 20 वर्षांपासून बंडातात्यांचं हे कार्य सुरू आहे. त्याशिवाय युवकांना इतिहास माहीत व्हावा म्हणून ते गडकोटांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन करतात. 1997पासून ही सुरुवात झाली, ती आजतागायत सुरू आहे.

वारकरी शिक्षण देणारी पहिली शाळा

व्यसनमुक्ती करतानाच त्यांनी गुरुवर्य भगवान मामा कराडकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये ही संस्था कार्यरत आहे. या शिक्षण संस्थेतून गुरुकूल पद्धतीने शिक्षण दिलं जातं. विशेष म्हणजे राज्यातील पहिली वारकरी शिक्षण देणारी ही शाळा आहे.

संबंधित बातम्या:

राज्य सरकारला वाईन शॉप, डान्सबार खुले चालतात, मग पायी वारी का नको? : प्रविण दरकेर

बंडातात्या कराडकर यांची अटक म्हणजे आघाडी सरकारकडून वारकऱ्यांची मुस्कटदाबी : प्रविण दरेकर

(Sambhaji Bhide slams MVA Government over action on Bandatatya Karadkar and Aashadhi Wari restrictions)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.