बंडातात्या कराडकर यांची अटक म्हणजे आघाडी सरकारकडून वारकऱ्यांची मुस्कटदाबी : प्रविण दरेकर

बंडातात्या कराडकर यांची अटक म्हणजे राज्य सरकारने केलेली वारकऱ्यांची मुस्कटदाबी आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.

बंडातात्या कराडकर यांची अटक म्हणजे आघाडी सरकारकडून वारकऱ्यांची मुस्कटदाबी : प्रविण दरेकर


मुंबई : “कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारनं पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मात्र, पायी वारी व्हायला हवीचं, अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली. असं असताना आज पायी चालत पंढरीकडे निघालेले कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे. हे सरकार आता वारकऱ्यांनासुद्धा सोडत नाही. अशाप्रकारे राज्य सरकार वारकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे,” अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली (Pravin Darekar criticize MVA government for arrest of Bandatatya Karadkar).

कोरोनाचा धोका अदयापही कायम असताना वाईन शॉप, बार सुरु करण्याची परवनागी देण्यात येते, मात्र लाखो भक्तांची श्रध्दास्थाने असलेली मंदिर मात्र उघडण्यास राज्यसरकारकडून परवानगी का दिली जात नाही, असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

कल्याणमधील मारहाणीची घटना निंदनीय

कल्याणमधील मारहाणीची घटना निंदनीय आहे. या घटनेमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा कसा उडाला आहे हे दिसून येते. ही अमानुषपणे झालेली मारहाण करणे म्हणजे पोलिसांचे व पर्यायाने सरकारचे अपयश आहे. रस्त्यावर पट्टे काढून जुलमी पद्धतीने मारहाण कशी होऊ शकते ? यावेळी कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलिस कुठे होते ? काय करत होते ? अमानवी पद्धतीने मारहाण करणं अत्यंत चुकीचं आहे, असे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी स्पष्ट केले.

साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे

कायद्यासमोर सर्व समान आहेत. जे कोणी दोषी असतील मग ते भाजपचे असो किंवा इतर पक्षाचे त्यांच्यावर कारवाई करावी, परंतु आपल्या अंगावर आले म्हणून तुमच्या अंगावर यावे असं काही होत नसते. कायद्याच्या चौकटीत कारवाई होत असते, असे दरेकर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 2 जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे निघणार, वाचा 2 ते 24 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम

संत तुकाराम महाराज पालखी 1 जुलैला देहूवरुन पंढरपूरकडे निघणार, वाचा 1 ते 19 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम

पोलिसांच्या शिष्टाईला यश, बंडातात्या कराडकर यांच्याकडून पायी वारीचा निर्णय मागे

व्हिडीओ पाहा :

Pravin Darekar criticize MVA government for arrest of Bandatatya Karadkar

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI