संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 2 जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे निघणार, वाचा 2 ते 24 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2 जुलैला सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 2 जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे निघणार, वाचा 2 ते 24 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम
आषाढी वारी, फाईल फोटो


पुणे : आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2 जुलैला सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून केली जात आहे. पालखी सोहळ्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. माऊलींच्या चलपादुका विशेष वाहनाने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत (Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi Sohala Ashadhi wari program Alandi to Pandharpur).

प्रस्थान कार्यक्रम 2 ते 24 जुलै वारी सोहळा

पहाटे 4 ते 5.30 : घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती
सकाळी 9 ते 11 : वीणा मंडपात कीर्तन
दुपारी 12 ते 12.30 : गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व महानैवेद्य
सायंकाळी 4 : प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ
सायंकाळी 6 : माऊलींचा सोहळा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी

  • प्रस्थानानंतर 3 ते 19 जुलै : आजोळघरी माऊलींच्या पादुकांवर परंपरेनुसार सर्व नैमित्तिक उपचार
  • 19 जुलै : माऊलींच्या चलपादुका सकाळी 10 वाजता एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ
  • 19 ते 24 जुलै : माऊलींच्या पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी
  • 24 जुलै : पौर्णिमेला काला समाप्तीनंतर पंढरपूरहून आळंदीकडे एसटी बसने परतीचा प्रवास

हेही वाचा :

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदीत 7 दिवस संचारबंदी, सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार

आषाढी एकादशी वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्याचा प्रस्ताव, पुढच्या आठवड्यात अंतिम निर्णय शक्य

Pandharpur Yatra | यंदाची वारी कशी व्हावी? पंढरपुरातील व्यापाऱ्यांना काय वाटतं?

व्हिडीओ पाहा :

Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi Sohala Ashadhi wari program Alandi to Pandharpur

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI