आषाढी एकादशी वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्याचा प्रस्ताव, पुढच्या आठवड्यात अंतिम निर्णय शक्य

कोरोनाचं प्रमाण कमी झालेलं आहे (Pandharpur Ashadhi wari). लॉकडाऊनमध्येही शिथिलता देण्यात आलेली आहे. असं असलं तरी खबरदारी म्हणून यावर्षीही महाराष्ट्राची पारंपारीक आषाढी एकादशीची वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्याचा प्रस्ताव सोलापूर जिल्हा प्रशासनानं दिलेला आहे.

आषाढी एकादशी वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्याचा प्रस्ताव, पुढच्या आठवड्यात अंतिम निर्णय शक्य
Ashadhi Vari

सोलापूर : कोरोनाचं प्रमाण कमी झालेलं आहे (Pandharpur Ashadhi wari). लॉकडाऊनमध्येही शिथिलता देण्यात आलेली आहे. असं असलं तरी खबरदारी म्हणून यावर्षीही महाराष्ट्राची पारंपारीक आषाढी एकादशीची वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्याचा प्रस्ताव सोलापूर जिल्हा प्रशासनानं दिलेला आहे. विभागीय आयुक्त पुढच्या आठवड्यात यावर निर्णय घेतील अशी शक्यता आहे (Pandharpur Ashadhi wari proposal final decision will be take soon).

कधी आहे वारी?

22 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्याआधीच संपूर्ण महाराष्ट्रातून विविध पालख्या पंढरपूरसाठी विठ्ठल भेटीसाठी प्रस्थान ठेवतात. पण गेल्यावर्षी पहिल्यांदा ह्या वारीत खंड पडला. छोट्या स्वरुपात वारीचा सोहळा पार पडला. कारण कोरोना महामारीचं संकट. यावर्षीही हे संकट कायम आहे. कोरोनाची तिसरी, चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच यावर्षीचीही वारी ही प्रतिकात्मक स्वरुपात करावी अशी मागणी होते आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर-सोलापूर प्रशासनानं तसा प्रस्ताव तयार केलेला आहे.

पालखी मार्गावरील गावांचा विरोध

आषाढी एकादशी वारीच्या आधी तीन आठवडे महाराष्ट्राच्या विविध भागातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या प्रस्थान ठेवतात. त्यात आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका तर देहुतून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. विदर्भ, मराठवाड्यातूनही विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे पायी येतात. त्यालाच वारी म्हटलं जातं. ह्या सगळ्या पालख्या, पुणे, सातारा, सोलापूर अशा जिल्ह्यातून प्रवास करतात. त्या वारीत हजारो वारकरी मजल दरमजल करत पालखीसोबत पायी चालतात. वारी मार्गावर जिथे पालखी मुक्कामी असते तिथं वारकऱ्यांचाही मुक्काम पडतो. काही मोजकी गावं आहेत जिथं हा मुक्काम पिढ्यान पिढ्या ठरलेला आहे. वारी केली तर यावर्षीही अशीच वारकऱ्यांची गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे वारी मार्गावरील काही गावांनी आतापासूनच वारी प्रतिकात्मक करावी म्हणून मागणी केलेली आहे. कारण त्या गावांनाही
कोरोनाचा धोका होऊ शकतो अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आषाढी वारी म्हणजे काय?

वारी म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघून पंढरपुरात वारकऱ्यांची पोहोचणारी एक सामुदायिक पदयात्रा. वारी ही महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक पंरपरा आहे. आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला वारी येते. एकादशीला नियमितपणे पंढरपूर-आळंदीला जाणे म्हणजे वारी. वारकरी जो पाळतात तो भागवत धर्म. भागवत संप्रदयाची ही परंपरा इतर परंपरांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. कारण ह्या वारीत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. त्यांनाच वारकरी म्हटलं जातं. गेल्या काही काळापासून तर विदेशी नागरिकही मोठ्या प्रमाणात ह्या वारीत सहभागी होताना दिसत आहेत.

Pandharpur Ashadhi wari proposal final decision will be take soon

संबंधित बातम्या :

किमान 100 वारकऱ्यांसोबत पायी वारीला जाण्याची परवानगी द्या; आळंदी देवस्थानाची मागणी

यंदाही गतवर्षीसारखा पालखी सोहळा एसटीतून आणा, अन्यथा गाव बंद ठेवणार, वाखरी ग्रामस्थांचा इशारा